त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

Updated:June 24, 2025 14:22 IST2025-06-24T14:18:59+5:302025-06-24T14:22:18+5:30

kidney health awareness: skin and kidney health connection : kidney disease early symptoms: किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

किडनी आपल्या शरीरातील महत्त्वाचा भाग आहे. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्याचे काम करते. तसेच अनेक आजारांपासून रक्षण करण्याचे काम किडनी करते. (kidney health awareness)

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

ज्यावेळी किडनी आपल्या रक्तातील कचरा फिल्टर करण्याची क्षमता गमावते तेव्हा आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. ही ६ लक्षणे दिसल्यास किडनी खराब होण्याचा धोका वाढतो. (skin and kidney health connection)

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

किडनीच्या समस्यांमुळे त्वचा कोरडी पडते आणि खाज सुटू लागते. मूत्रपिंड योग्यरित्या कार्य करत नाहीत तेव्हा रक्तातील खनिजे आणि पोषक तत्वांचे संतुलन बिघडते.

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

किडनी फेल झाल्याची लक्षणे लघवीमध्ये दिसून येतात. अशा वेळी वारंवार लघवीला होणे, लघवीतून रक्त येणे, लघवी करताना अधिक फेस येणे. यांसारख्या समस्यांकडे दुर्लक्ष करु नका.

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

आपल्या डोळ्यांचा खालचा भाग सुजलेला वाटत असेल तर किडनीच्या आरोग्याची काळजी घ्यावी.

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

टाचांमध्ये किंवा तळपायांमधून पाणी निघणे हे किडनीचे काम व्यवस्थित होत नाही आहे याचे लक्षण आहे. तसेच हृदयरोग आणि मज्जातंतूंच्या समस्यांशी देखील सामना करावा लागतो.

त्वचा कोरडी पडली-पायांवरही सूज आली? किडनीच्या आजाराचीच ‘ही’ ६ लक्षणं, जीवाला धोका..

इलेक्ट्रोलाइट असंतुलन हे किडनीच्या खराब कार्यामुळे होते. यामध्ये कॅल्शियमची पातळी कमी होऊन स्नायू दुखतात.