1 / 6आजकाल IVF ट्रिटमेंट सुलभ झाली आहे. IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन. नैसर्गिक पद्धतीने गर्भधारणा होण्यात काही अडचण असेल तर ही पद्धत उपयुक्त ठरते. अनेक जण या पद्धतीचा अवलंब करतात. ही ट्रिटमेंट काहीशी वेदनादायी असली तरी सुरक्षितही आहे असे डॉक्टर सांगतात. बाळ होण्याचं स्वप्न त्यानं साकारु शकतं. अनेक सेलिब्रिटींनीही पालकत्वासाठी हा पर्याय स्वीकारलेला दिसतो.2 / 6इशा अंबानीला बाळ होताना अनेक अडचणी आल्या. तिने IVF ट्रिटमेंट घेतल्याचे विविध वृत्त सांगतात. इशा म्हणते, उपलब्ध ट्रिटमेंट्स घेण्यात लाज वाटण्यासारखे काही नाही. वैद्यकीय सल्ल्याने ते करायला हरकत नाही.3 / 6जय भानुशाली आणि माही विज यांना तारा नावाची एक गोड मुलगी आहे. माहीने आयव्हीएफचा पर्याय स्वीकारला. तो प्रवास अजिबात सोपा नव्हता असं ती सांगते. पण आम्हा दोघांनाही गरोदरपणाचा अनुभव हवा होता म्हणून आयव्हीएफ केल्याचं ती सांगते. मात्र त्यादरम्यान आपण शंभर तरी इंजेक्शन घेतल्याचं ती म्हणते. 4 / 6देबिना बॅनर्जी आणि गुरमीत चौधरी यांना लियाना व दिविशा या दोन मुली आहेत. देबिनाने तिच्या IVF च्या प्रवासाबद्दल सांगितले. फक्त शारीरिक नाही तर भावनिक थकवाही या प्रोसेसमध्ये येतो असे देबिना म्हणाली. नंतर तिला एक मुलगी नॉर्मल गर्भधारणेतूनही झाली.5 / 6अमृता राव आणि आर.जे अनमोल यांनी विविध पद्धतींचा अवलंब केला. अमृताने IVF ट्रिटमेंट घेतली. मात्र त्यांना यश आले नाही. त्यांनी बरेच प्रयत्न केल्यावर आशा सोडून दिली. मात्र काहीही ट्रिटमेंट चालू नसताना नैसर्गिकरित्या गर्भधारणा कालांतराने झाली. 6 / 6