मायग्रेनच्या त्रासाने डोकं उठलं? इवलासा आल्याचा तुकडा ‘या’ पद्धतीने चघळा, डोकेदुखी होईल कमी
Updated:January 6, 2026 19:00 IST2026-01-06T19:00:00+5:302026-01-06T19:00:01+5:30
migraine headache: severe headache relief: ginger for migraine: डोकेदुखी, मायग्रेनचा त्रास होत असेल तर आले या पद्धतीने खा

अनेकांना डोकेदुखी, मायग्रेन सहन होत नाही. कामाचा ताण, झोपेचा अभाव, मोबाईल स्क्रीनचा अतिवापर, हारमोनी बदल किंवा बदलेली जीवनशैली यामुळे मायग्रेनचा त्रास मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. अशावेळी डोकेदुखी इतकी वाढते की रोजच काम करणंही अवघड होतं. सतत औषधे घेऊनही आराम मिळत नाही. पण स्वयंपाकघरात मिळणार आलं हा पारंपरिक उपाय मानला जातो. (migraine headache)
आल्यामध्ये नैसर्गिक दाहशामक आणि वेदनाशामक गुणधर्म आहेत. असं आयुर्वेदात सांगितलं जातं. मायग्रेनमध्ये मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये होणारी सूज आणि ताण यामुळे वेदना वाढतात. आल्याचा योग्य पद्धतीने वापर केल्यास हा ताण काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. पाहूयात आल्याचे सेवन कसं करायला हवं.(severe headache relief)
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनच्या मते संशोधनातून असं आढळून आलं आहे की, लोकांमध्ये मायग्रेन आणि डोकेदुखीची लक्षणे कमी करण्यासाठी आले हे प्रभावी ठरु शकते. याचा कोणताही आरोग्यावर गंभीर परिणाम होत नाही.
आल्यामध्ये असलेले सक्रिय घटक शरीरातील जळजळ नियंत्रित करण्यास मदत करतात. डोकेदुखी आणि मायग्रेन बहुतेकदा जळजळ आणि रक्तवाहिन्यांशी जोडलेले असतात. त्यामुळे डोकेदुखी थांबवण्यासाठी आलं चांगलं आहे.
मायग्रेन किंवा डोके दुखत असेल तर आल्याचा छोटासा तुकडा चघळा. ज्यामुळे आराम मिळेल.
आल्याचा आपण अनेक प्रकारे आहारात वापर करु शकतो. आल्याचा चहा, कोमट पाण्यात आले किसून घालणे किंवा जेवणात मसाला म्हणून आल्याचा वापर करता येईल.
आल्याचा आपण अनेक प्रकारे आहारात वापर करु शकतो. आल्याचा चहा, कोमट पाण्यात आले किसून घालणे किंवा जेवणात मसाला म्हणून आल्याचा वापर करता येईल.