तुमचंही ट्रायग्लिसराईड्स खूप वाढलंय? तेल कमी करून उपयोग नाही, करा ‘या’ ५ गोष्टीही
Updated:December 23, 2024 16:28 IST2024-12-22T09:13:06+5:302024-12-23T16:28:21+5:30

शरीरातली ट्रायग्लिसराईड्सची पातळी मर्यादेपेक्षा जास्त वाढणं हृदयासाठी चांगले नाही. हल्ली ट्रायग्लिसराईड्स वाढले की बरेच जण फक्त आहारातले तेलाचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करतात.
पण फक्त तेवढं करणंच उपयोगाचं नाही. त्यासोबतच आणखी काही गोष्टीही आवर्जून करायला पाहिजेत, असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. याविषयीचा व्हिडिओ त्यांनी amitagadre या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर केला आहे.
आहारतले कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करायला हवे. त्यासाठी गव्हाची पोळी, भात तसेच इतर स्टार्च असणाऱ्या भाज्या, फळं कमी प्रमाणात खावी.
त्याचबरोबर आहारातले फायबरचे प्रमाण वाढवावे. त्यासाठी कडधान्ये, भाज्या भरपूर प्रमाणात खाव्या.
साखर, साखरेचे पदार्थ, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, पॅकफूड, शुगरी सोडा असे पदार्थ खाणं पुर्णपणे टाळावं. तसेच केक आणि इतर बेकरी पदार्थही टाळावे.
जर ट्रायग्लिसराईड्सची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर दररोज ३० मिनिटे तरी व्यायाम करायलाच हवा.