पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

Updated:June 16, 2025 13:12 IST2025-06-16T13:06:07+5:302025-06-16T13:12:09+5:30

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

काही जणांचं कोलेस्टेरॉल नेहमीच खूप वाढलेलं असतं. कोलेस्टेरॉल वाढलेलं असेल तर सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि त्यांनी सुचवल्याप्रमाणे नियमितपणे गोळ्याऔषधी घेणं खूप गरजेचं आहे.(how to reduce cholesterol?)

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

त्यासोबतच आहारातही काही पथ्यं पाळणं आवश्यक आहे. आपल्या स्वयंपाक घरात असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही रोज खाल्ले तर तुमचं काेलेस्टेरॉल नियंत्रित राहण्यास मदत होते.(best 5 ingredients in kitchen that helps to reduce LDL cholesterol)

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉ. सुमित कपाडिया यांनी इंस्टाग्रामवर शेअर केली आहे. त्यापैकी सगळ्यात पहिला पदार्थ म्हणजे मेथीदाणे. त्यामध्ये फायबर जास्त प्रमाणात असतात. रात्रभर पाण्यात भिजवलेले मेथी दाणे सकाळी उपाशीपोटी खाल्ल्याने चांगला फायदा होतो.(super food to reduce bad cholesterol)

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

नारळ किंवा खोबरं थोड्याशा प्रमाणात दररोज खाल्ल्यास शरीरातलं बॅड कोलेस्टेराॅल कमी होते. चटणीच्या स्वरूपातही तुम्ही ते नियमितपणे खाऊ शकता.

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी भेंडी देखील एक सुपरफूड मानली जाते. पण बऱ्याच लोकांना भेंडी खाणे आवडत नाही. कोलेस्टेराॅलचा त्रास असेल तर आवडत नसतानाही थोडीशी भेंडी नियमितपणे खावी. कारण भेंडीमध्ये जो चिकट फायबर असतो तो शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल बाहेर काढण्यासाठी मदत करतो.

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

सफरचंद, पेरू, आवळा यापैकी एखादं फळ तरी रोज खायला हवं. त्यामुळे शरीरातल्या बॅड कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते.

पथ्यं पाळूनही कोलेस्टेरॉल वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ पदार्थ रोज खा- कोलेस्टेरॉल राहील कंट्रोलमध्ये

ज्यांना कोलेस्टेरॉलचा नेहमीच त्रास असतो त्यांनी त्यांच्या आहारात नियमितपणे लसूण खायला हवा. लसूण खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रित राहण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते दररोज जेवण करताना लसणाच्या कच्च्या एक- दोन पाकळ्या बारीक चावून खायला हव्या.