कोलेस्टेरॉलचं टेन्शन? शरीरातलं चांगलं कोलेस्टेरॉल वाढविण्यासाठी ५ टिप्स, हृदयाचे आरोग्य राहील ठणठणीत
Updated:August 1, 2025 19:05 IST2025-08-01T18:59:18+5:302025-08-01T19:05:58+5:30

बॅड कोलेस्टेरॉल आणि गूड कोलेस्टेराॅल असे आपल्या शरीरात असतात. त्यातील चांगले कोलेस्टेरॉल म्हणजे एचडीएल वाढले की ते आपल्या हृदयाचे आरोग्य उत्तम ठेवण्यास मदत करतात.
चांगले कोलेस्टेरॉल वाढावे आणि आपल्या हृदयाचे आरोग्य ठणठणीत राहावे, यासाठी कोणते पदार्थ आपल्या आहारात असायला हवे, याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी amitagadre या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
ओमेगा ३ भरपूर प्रमाणात देणारे पदार्थ खायला हवे. जवस, चिया सीड्स, अक्रोड, धणे या पदार्थांमध्ये ओमेगा ३ चांगल्या प्रमाणात असते.
आहारातले भाज्यांचे आणि फायबरयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे.
त्याचबरोबर वेगवेगळ्या डाळी तसेच कडधान्येही भरपूर प्रमाणात खावी.
आहारासोबतच व्यायामही महत्त्वाचा आहे. त्यामुळे एका जागी बसून राहाणे टाळा. कोणता ना कोणता व्यायाम करा. शारिरीक हालचाली वाढवा.
स्मोकिंग, अल्कोहोल असे कोणतेही व्यसन बंद करा. ते शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल वाढते.