PCOD त्रास १ महिन्यात कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, मासिक पाळीच्या तक्रारी होतील दूर..
Updated:March 23, 2026 15:48 IST2026-03-23T15:39:02+5:302026-03-23T15:48:51+5:30

पीसीओडीचा त्रास हल्ली खूप वाढला आहे. बहुतांश मुलींना, महिलांना हा त्रास होतोच. हा त्रास कमी करायचा असेल तर काही पदार्थ आपल्या आहारात नियमितपणे घेणं गरजेचं आहे.
हे पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती डॉक्टरांनी dr__sonali__sawant या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. त्यामध्ये सांगण्यात आलेले पदार्थ नेमके कोणते ते पाहुया..
यापैकी पहिला पदार्थ आहे अक्रोड. अक्रोडमधून ओमेगा ३ आणि गुड फॅट्स चांगल्या प्रमाणात मिळतात. त्यामुळे हार्मोनल बॅलेन्स उत्तम राहातो. पीसीओडी समस्या निर्माण होण्यामागे मुख्य कारण हेच आहे की हार्मोन्सचे संतुलन बिघडते. ते आपण अक्रोडद्वारे नियंत्रित ठेवू शकतो.
दुसरा पदार्थ आहे काळ्या मनुका. मनुकांमधून लोह आणि मॅग्नेशियम दोन्ही चांगल्या प्रमाणात मिळते. त्यामुळे रक्तवाढीसाठी त्याचा चांगला फायदा होतो. शिवाय मनुकांमुळे शरीराचा थकवाही दूर होतो.
पीसीओडीचा त्रास कमी करणारा आणखी एक पदार्थ म्हणजे अंजीर. अंजीरमधल्या बारीक बियांमध्ये ॲण्टीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात जास्त प्रमाणात असणारं इस्ट्राेजीन किंवा इतर टॉक्सिन्स शरीरातून बाहेर काढण्यासाठी मदत होते.
या सर्व गोष्टींमुळे पीसीओडीचा त्रास निश्चितच कमी होऊ शकतो.