1 / 8हिवाळ्याच्या दिवसांत सांधेदुखीचा त्रास खूप वाढतो. कारण या दिवसांत अंगातलं मॉईश्चर कमी होतं. त्याचा परिणाम स्नायू आणि जॉईंट्सवरही होतो.2 / 8त्यामुळे हिवाळ्यात पाय, कंबर, पाठ जास्त दुखते अशी तक्रार अनेकजण करतात. शिवाय ज्यांना आधी कधी हाडांवर मार लागलेला असतो, फ्रॅक्चर झालेलं असतं त्यांच हाडांचं जुनं दुखणंही या दिवसांत नव्याने सुरू होतं.3 / 8म्हणूनच हा त्रास कमी करायचा असेल तर मनुका खूप उपयोगी ठरतात. पण त्या योग्य पद्धतीने खाल्ल्या गेल्या पाहिजेत.4 / 8काळ्या मनुकांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असतं. हाडांच्या बळकटीसाठी हे दोन्ही घटक खूप महत्त्वाचे आहेत.5 / 8याशिवाय काळ्या मनुकांमधून लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम हे घटकही भरपूर प्रमाणात मिळतात.6 / 8काळ्या मनुक्यांमधल्या या गुणधर्माचा शरीराला पुरेपूर लाभ होण्यासाठी दररोज रात्री झोपण्यापुर्वी मनुका स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर अर्धी वाटी पाण्यात ८ ते १० मनुका भिजत घाला.7 / 8दररोज सकाळी उपाशीपोटी भिजलेल्या मनुका बारीक चावून खा आणि मनुक्यांचं पाणी पिऊन घ्या. 8 / 8हा उपाय केल्यामुळे हाडं तर बळकट होतातच, पण मासिक पाळीच्या काळात होणाऱ्या वेदनाही कमी होतात, असं आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकर यांनी एका इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये सांगितलं होतं.