बीपी नेहमीच वाढलेलं असतं? डॉक्टर सांगतात ५ उपाय, ब्लड प्रेशर राहील कंट्रोलमध्ये
Updated:February 8, 2026 09:45 IST2026-02-08T09:40:19+5:302026-02-08T09:45:01+5:30

चुकीच्या जीवनशैलीमुळे हल्ली अनेकांना बीपी म्हणजेच ब्लड प्रेशरचं दुखणं मागे लागत आहे.(how to control blood pressure?)
बीपीचा त्रास असल्यावर सगळ्यात आधी डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांच्या सल्ल्याने योग्य त्या गोळ्या औषधी घेणे खूप गरजेचे आहे. पण तरीही काही उपाय घरच्याघरी तुम्ही नियमितपणे करू शकता. ते उपाय कोणते याविषयीची माहिती डॉ. शालिनी यांनी शेअर केली आहे.(5 tips to control high bp level)
यामध्ये त्यांनी सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे ब्लड प्रेशर जर नियंत्रित ठेवायचं असेल तर आहारातलं मीठ कमी करा. जेणेकरून सोडियम वाढणार नाही. चिप्स, पॅकफूड यांच्यामध्ये मीठ खूप जास्त प्रमाणात असतं. ते पदार्थ खाणंही टाळायला हवं.(5 step formula to lower blood pressure naturally)
दुसरा उपाय म्हणजे आहारातलं पोटॅशियमचं प्रमाण वाढवा. त्यासाठी केळी, संत्री, पालक, टोमॅटो असे पदार्थ नियमितपणे खा. कारण शरीरातलं पोटॅशियम वाढलं तर जास्तीचं सोडियम शरीराबाहेर जाण्यास मदत होते आणि त्यामुळे मग बीपी कंट्रोलमध्ये राहाते.
बीपी कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आणखी एक उपाय म्हणजे व्यायाम. नियमितपणे व्यायाम करा. त्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह सुरळीत राहातो आणि त्यामुळे आपोआपच बीपी कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते.
ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. यामुळे शरीरातलं कॉर्टीसॉल वाढतं. त्याचा परिणाम बीपी वाढण्यावर होतो. त्यामुळे दिर्घश्वसन करून ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. नियमितपणे प्राणायाम केल्यानेही बीपी नियंत्रित राहातं.
पाचवा उपाय म्हणजे राेज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्यायलाच हवी. कारण पुरेशी झोप झाली नाही तर शरीरातला स्ट्रेस हार्मोन वाढतो. त्याचा परिणाम बीपीवर होतो. त्यामुळे झोप खूप महत्त्वाची आहे.