Home Cleaning Tips : फक्त ५ मिनिटांत काळं पडलेलं स्विच बोर्ड होईल चकचकीत; 'या' घ्या बटन्स साफ सफाईच्या सोप्या टिप्स
Updated:October 21, 2021 19:45 IST2021-10-21T19:33:11+5:302021-10-21T19:45:57+5:30
Home Cleaning Tips : . स्विच बोर्ड आणि बटन्स रोज स्पर्श केल्यामुळे काळपट पडतात, त्यावर कसलेही गडद डाग लागल्यानं अस्वच्छ, जुनाट दिसायला सुरूवात होते.

दिवाळीला फार थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. घरोघरी साफसफाईची लगबग सुरू झालीये. जे काम हातात घेतलंय ते पटकन पूर्ण व्हावं असं प्रत्येक वाटतं. सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत कमीत कमी वेळात जास्त चांगली काम कशी करता येतील याकडे सर्वच महिलांचा भर असतो. साफसफाई करणं म्हणजे किचनमधली सर्व भांडी घासणं, जळमटं काढणं एव्हढचं काम नसतं.
घरातील काही वस्तू स्वच्छ करण्याकडे नेहमीच दुर्लक्ष होत असतं त्यापैकी एक म्हणजे स्विच बोर्ड. स्विच बोर्ड आणि बटन्स रोज स्पर्श केल्यामुळे काळपट पडतात, त्यावर कसलेही गडद डाग लागल्यानं अस्वच्छ, जुनाट दिसायला सुरूवात होते. स्विच बोर्ड साफ करताना सावधगिरी बागळणं गरजेचं आहे. (How to clean switch boards easily) स्विचबोर्ड साफसफाई करताना हातमोजे घालायला विसरू नका.
शेविंग क्रिम
एका बाऊलमध्ये शेव्हिंग क्रीम घ्या आणि ती स्विच बोर्डवर लावा. एका मिनिटानंतर दात घासण्याचा ब्रश घ्या आणि त्यावर घासून घ्या, दोन मिनिटांनी सुती कापडाने पुसून टाका. स्विच बोर्डच्या आत नाही तर त्यावर शेव्हिंग क्रीम लावा. जर डाग अधिक खोल असेल तर लावून स्वच्छ करा. शेवटी, सूती कापड हलके ओलसर करा आणि नंतर स्विच बोर्ड पुसून टाका.
नेलपेंट रिमुव्हर
बाजारात नेल पेंट काढण्यासाठी अनेक एसिटोन, एल्कोहोलचे प्रकार उपलब्ध आहेत. यापैकी तुमच्याकडे उपलब्ध असलेलं लिक्विड कापसामध्ये बुडवा आणि नंतर स्विच बोर्ड स्वच्छ करा. एकदा तुम्ही लावल्यानंतर तुम्हाला फरक दिसू लागेल. तरीही डाग हलके झाले असतील तर ते पुन्हा लावा. पाच मिनिटात तुम्हाला पूर्णपणे स्वच्छ स्विच बोर्ड दिसेल.
लिंबू आणि मीठ
आपण लिंबू आणि मिठानं स्विच बोर्ड स्वच्छ करू शकता. यासाठी लिंबू मीठात बुडवुन त्यवर स्विच बोर्ड घासून घ्या. नंतर सोडा आणि स्क्रबरच्या मदतीनं ते दोन मिनिटे स्वच्छ करा. घासून झाल्यानंतर, ते सुती कपडानं पुसून टाका जेणेकरून स्विच बोर्डवर अजिबात ओलावा राहणार नाही.
बेकिंग सोडा आणि लिंबू
बेकिंग सोडा आणि लिंबू दोन्ही वेगवेगळ्या प्रकारे वापरले जातात. पण स्विच बोर्ड साफ करण्यासाठी दोन्ही एकत्र मिसळा. आता या मिश्रणात एक जुना टूथब्रश बुडवून स्विचवर घासून घ्या आणि नंतर सुती कापडाने स्वच्छ करा. जर डाग पूर्णपणे निघाले नाही तर ही प्रक्रिया पुन्हा करा.
टॉयलेट क्लिनर
बाजारात अनेक प्रकारचे टॉयलेट क्लीनर उपलब्ध आहेत. त्यापैकी तुम्ही वापरत असलेलं क्लिनर ब्रशवर लावा आणि नंतर स्विच बोर्डवर घासून टाका. जर डाग गेले असतील तर ते स्वच्छ आणि कोरड्या सुती कापडाने पुसून टाका.