Join us
Daily Top 2 Weekly Top 5

मेनोपॉज म्हणजे नव्या आयुष्याची सुरुवात! महिलांनी चाळिशीत विसरूच नयेत ५ गोल्डन रुल्स, राहाल कायम आनंदी आणि फिट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2026 17:17 IST

1 / 7
वयाची पस्तीशी ओलांडली की महिलांच्या शरीरात अनेक बदल होताना दिसतात. स्त्रीच्या आयुष्यातील हा टप्पा अनेक शारिरीक आणि मानसिक बदलांची नांदी घेऊन येतो. या वयात आल्यानंतर शरीरात हार्मोन्स बदल होतात ज्याला मेनोपॉज असं म्हणतात. या काळात वृद्धत्वाकडे झुकणे किंवा उत्साह संपणे अशा नकारात्मक दृष्टीने पाहिलं जातं. खऱ्या अर्थाने मेनोपॉज हा आयुष्याचा शेवट नसून एका नव्या आणि परिपक्व आयुष्याची सुरुवात आहे. या काळात चिडचिड होणे, अचानक घाम येणे (Hot Flashes), हाडे ठिसूळ होणे आणि झोप न लागणे अशा समस्या जाणवू शकतात.(Women's health and wellness guide Marathi)
2 / 7
अनेकदा महिला या बदलांना घाबरुन त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अशावेळी योग्य आहार, व्यायाम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास आपण उत्साही आणि आनंदी राहू शकतो. रजोनिवृत्तीनंतर आपली सेकंड इनिंग साजरी करण्यासाठी कोणते ५ गोल्डन रुल्स लक्षात ठेवायला हवे पाहूया.(Healthy lifestyle tips for women over 40)
3 / 7
मेनोपॉजमध्ये आपली हाडे ठिसूळ होण्याचा धोका सगळ्यात जास्त असतो. ४० नंतर हाडांची घनता कमी होऊ लागते. अशावेळी आहारात दूध, दही, पनीर, नाचणी आणि हिरव्या पालेभाज्या खा. सकाळी १० ते १५ मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. ज्यामुळे शरीराला नैसर्गिक व्हिटॅमिन डी मिळेल.
4 / 7
शरीरातील इस्ट्रोजेनची कमतरता भरून काढण्यासाठी आहारात सोयाबीन, जवसाच्या बिया, तीळ आणि कडधान्ये खा. यातील फायटो- इस्ट्रोजेन आपले हॉट फ्लॅशेस आणि मूड स्विंग्स कमी करण्यास मदत करते.
5 / 7
आपल्या वयानुसार स्नायूंची ताकद कमी होते. ज्यामुळे वजन आणि पोटावरची चरबी भरभर वाढते. त्यासाठी रोज किमान ३० मिनिटे वेगाने चाला. आठवड्यातून दोनदा स्ट्रेंथ ट्रेनिंग करा. तसेच मन:शांतीसाठी प्राणायाम किंवा ध्यान करा.
6 / 7
मेनोपॉजमध्ये निद्रानाशाची समस्या अनेक महिलांना सतावते. कमी झोपल्यामुळे चिडचिड आणि थकवा वाढतो. त्यासाठी दिवसातून किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या. रात्री झोपण्यापूर्वी स्क्रीनपासून लांब राहा. ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा.
7 / 7
मानसिक आरोग्य हे शारीरिक आरोग्याइतकेच महत्त्वाचे आहे. यामध्ये नैराश्य आणि एकटेपणा टाळणे गरजेचे आहे. यासाठी आपला आवडता छंद जोपासा, मित्र-मैत्रिणींशी किंवा कुटुंबाशी मनातल्या गोष्टी बोलून दाखवा. तुम्ही आनंदी असाल तरच तुमचे कुटुंब आनंदी राहील.
टॅग्स : आरोग्यमहिलामासिक पाळी आणि आरोग्य