घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

Updated:August 24, 2025 16:28 IST2025-08-24T16:17:12+5:302025-08-24T16:28:41+5:30

घरच्या घरी काही सोपे उपाय करून या घशातील खवखव, खोकला कमी होऊ शकतो.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

पावसाळ्यात घशात खवखवणे आणि खोकला येणे सामान्य आहे. मात्र काम करताना किंवा बोलताना खूप त्रास होतो. बरेचदा लोक औषध घेतात, पण काहीच फायदा होत नाही.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येवर सहज मात करू शकता. घरच्या घरी काही सोपे उपाय करून घशातील खवखव, खोकला कमी होऊ शकतो.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

आल्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेंटरी गुणधर्म असतात जे घशातील सूज आणि घशातील खवखव यावर त्वरित आराम देतात. आल्याचा चहा कफ कमी करतो आणि घशाला आराम देतो.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

मधाला नैसर्गिक कफ सिरप म्हणतात. त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे घशातील खवखव कमी करतात आणि आराम देतात.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

कोमट पाण्यात मीठ घालून गुळण्या करणं हा घशासाठी रामबाण उपाय आहे. यामुळे घशातील खवखव लगेच बरी होते आणि कफ काढून टाकण्यास मदत होते.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

लसूणमध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-व्हायरल गुणधर्म घशातील संसर्ग दूर करतात. ते खाल्ल्याने किंवा उकळलेले पाणी प्यायल्याने घसा खवखवणे आणि खोकला या दोन्हीपासून आराम मिळतो.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

घसा खवखवणे आणि खोकल्यासाठी तुळस खूप फायदेशीर आहे. तुळशीचा चहा प्यायल्याने किंवा त्याची पाने उकळल्याने घशात त्वरित आराम मिळतो.

घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय

हळदीमध्ये अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. गरम हळदीचे दूध प्यायल्याने घसादुखी आणि घशातील खवखव लवकर बरी होते आणि रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते.