जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
Updated:May 6, 2025 17:41 IST2025-05-06T17:31:09+5:302025-05-06T17:41:41+5:30
जादू की झप्पी म्हणजेच एक मिठी कोणत्याही रुग्णाला बरं करू शकते, एखाद्याच्या दु:खावर फुंकर घालू शकते असं म्हणतात. पण खरंच फायदा होतो का?

'जादू की झप्पी' हा 'मुन्नाभाई एमबीबीएस' चित्रपटातील डायलॉग आपण नेहमीच अनेकांकडून ऐकतो. जादू की झप्पी म्हणजेच एक मिठी कोणत्याही रुग्णाला बरं करू शकते, एखाद्याच्या दु:खावर फुंकर घालू शकते असं म्हणतात. पण खरंच फायदा होतो का?
एखाद्याला मिठी मारल्यानंतर नेमकं काय होतं, कसा बदल घडतो याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मिठी मारल्याने व्यक्तीच्या शरीरावर आणि मनावर सकारात्मक परिणाम होतात. त्याचे अनेक फायदे असू शकतात.
हग थेरपी म्हणजे काय?
हग थेरपी म्हणजे एखाद्याला आनंदाने मिठी मारणं. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला भावनिक मदत मिळू शकेल. ही थेरपी विशेषतः तणाव, एकटेपणा आणि मानसिक तणावाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी प्रभावी मानली जाते. यामुळे त्यांना रिलॅक्स फील होतं.
ऑक्सिटोसिन हार्मोन वाढतं
मिठी मारल्याने शरीरातील लव्ह हार्मोन म्हणजेच ऑक्सिटोसिन बाहेर पडतो, ज्यामुळे व्यक्तीला समाधान मिळतं आणि चिंता मोठ्या प्रमाणात कमी होते.
ब्लड प्रेशर होतं कंट्रोल
रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, दररोज मिठी मारल्याने ब्लड प्रेशर आणि हार्ट रेट बॅलेन्स राहतो. हृदयाशी संबंधित समस्यांचा धोका कमी होतो.
तणाव आणि डिप्रेशनपासून मुक्तता
मिठी मारल्याने शरीरातील टेन्शन हार्मोन कोर्टिसोल कमी होतो, ज्यामुळे डिप्रेशन आणि तणाव कमी होतो. मानसिक आरोग्यासाठी हे टॉनिकपेक्षा कमी नाही.
मुलांमध्ये सुरक्षिततेची भावना
पालकांच्या मिठीमुळे मुलांमध्ये आत्मविश्वास, प्रेम आणि सुरक्षिततेची भावना वाढते. यामुळे मुलांना वाटतं की कोणीतरी त्यांच्यासोबत उभं आहे आणि त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करत आहे.
मिठी मारल्याने आजारी लोक बरे होऊ शकतात का?
आरोग्य तज्ञांच्या मते, आजारी व्यक्तीला मिठी मारल्याने त्याचे मानसिक आरोग्य सुधारतं. सकारात्मक विचार वाढतात आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. काही डॉक्टर याला सपोर्टिव्ह थेरपी मानतात, विशेषतः जे रुग्ण दीर्घकाळापासून तणाव किंवा एकाकीपणाने जगत आहेत त्यांच्यासाठी हे अत्यंत फायदेशीर आहे.