1 / 10राग नेहमीच मनावर अधिराज्य गाजवतो. तुम्हालाही छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो का? जर तुमचं उत्तर हो तर तुमचे आरोग्य धोक्यात आहे. विशेषतः ते तुमच्या हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.2 / 10तज्ज्ञांच्या मते, रागाचा परिणाम केवळ मनावर होत नाही तर तो शरीराच्या प्रत्येक भागावरही परिणाम करू शकतो. त्याचा हृदयावर सर्वात जास्त परिणाम होतो. जास्त रागावल्याने हार्ट ॲटॅकचा धोकाही वाढतो. 3 / 10जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपले शरीर तणावग्रस्त स्थितीत जातं. वाढलेलं एड्रेनालाईन आणि कॉर्टिसोलसारखे हार्मोनल बदल ब्लड प्रेशर वाढवतात. यामुळे हृदयाचे ठोके वाढू शकतात. जर ही स्थिती दीर्घकाळ राहिली तर हृदयावर अतिरिक्त दबाव येतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅकचा धोका वाढू शकतो.4 / 10युरोपियन हार्ट जर्नलच्या अॅक्यूट कार्डिओव्हस्कुलर केअरमध्ये प्रकाशित झालेल्या २०१४ च्या अभ्यासात असं आढळून आलं की रागाच्या उद्रेकानंतरच्या दोन तासांत हार्ट ॲटॅकचा धोका जवळजवळ पाच पटीने वाढतो. 5 / 10हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील संशोधकांनी २०१५ च्या विश्लेषणात अधोरेखित केलं की राग वारंवार येणं हृदयाशी संबंधित अनेक घटनांना कारणीभूत ठरू शकतं, विशेषतः अशा लोकांमध्ये जे आधीच खराब जीवनशैली जगतात.6 / 10रागाच्या वेळी शरीरात एड्रेनालाईनची लेव्हल वाढते, ज्यामुळे ब्लड प्रेशर वेगाने वाढतं. जर हे वारंवार घडत राहिलं तर हृदयावरील दाब वाढतो आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका निर्माण होऊ शकतो. जास्त काळ हाय ब्लड प्रेशर राहिल्याने हार्ट ॲटॅकचा धोका वाढतो.7 / 10रागाच्या भरात रक्तप्रवाह वाढतो आणि प्लेटलेट्स लवकर एकत्र चिकटू लागतात. यामुळे रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका वाढतो, जो हृदयासाठी धोकादायक ठरू शकतो. या गुठळ्यांमुळे हृदयाला होणारा रक्तपुरवठा विस्कळीत होऊ शकतो, ज्यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो.8 / 10जेव्हा तुम्ही रागावता तेव्हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढतात. जर हे सतत होत राहिले तर हृदयाला जास्त काम करावं लागतं. यामुळे हृदयरोग होऊ शकतात.9 / 10राग आल्यावर दीर्घ श्वास घ्या, यामुळे हृदय शांत होण्यास मदत होते. नियमित व्यायाम करा, त्यामुळे ताण कमी होतो आणि हृदय निरोगी राहते. 10 / 10मेडिटेशनमुळे मानसिक शांती मिळते, ज्यामुळे रागावर नियंत्रण ठेवण्यास मदत होते. सकारात्मक विचारसरणी स्वीकारा. विश्रांती घ्या, जेणेकरून तुम्ही मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या आनंदी राहू शकाल.