Join us   

रोज सकाळी नाश्ता करायलाच वेळ नाही? नाश्ता टाळण्याचे ७ गंभीर परिणाम, तब्येत-करिअर गोत्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2022 12:48 PM

1 / 10
१. सकाळच्या वेळी जवळपास प्रत्येक घरात थोड्या फार फरकाने एकसारखं चित्र दिसून येतं. ते म्हणजे घरातल्या सगळ्या मंडळींना काय हवं, काय नको ते बघणं आणि प्रत्येकासाठी चहा, नाश्ता, जेवण बनवून त्यांचे डबे भरणं.. या कामात दंग असणारी स्त्री.
2 / 10
२. सगळ्यांचं सगळं अगदी जबाबदारीने करणारी स्त्री मात्र स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यायला पार विसरून जाते. सगळ्यांना आग्रह करून करून खाऊ घालते, पण स्वत:चा नाश्ता, जेवणाच्या वेळा सांभाळायला तिच्याकडे वेळच नसतो.
3 / 10
३. तुमचीही अशीच कहाणी असेल तर वेळीच सावध व्हा. कारण वेळच मिळत नाही, खूप गडबड असते, असं सांगून स्वत:चा नाश्ता करण रोजच टाळत असाल, तर त्यामुळे आरोग्यावर अनेक विपरित परिणाम होऊ शकतात.
4 / 10
४. रात्रीच्या जेवणानंतर खूप मोठा गॅप झालेला असतो. त्यामुळे नाश्त्यामध्ये पोटात काहीतरी पौष्टिक जाणं गरजेचं असतं. पण नाश्ताच जर करत नसाल तर शरीराची चयापचय क्रिया बिघडू शकते आणि त्यातून पचनाच्या समस्या निर्माण होतात.
5 / 10
५. वारंवार डोकेदुखी हा अनेक महिलांना जाणवणारा त्रास. पोटात पुरेसं अन्न नसेल तर डोकेदुखीचा त्रास होणारच. त्यामुळे नाश्ता न करणं हे देखील डोकेदुखीचं कारण असू शकतं.
6 / 10
६. Mayo Clinic यांच्यावतीने १८ ते ४५ या वयोगटातील महिलांचा अभ्यास करण्यात आला. त्यानुसार असं दिसून आलं की नाश्ता न करणाऱ्या महिलांच्या शरीरात Cortisol या हार्मोनची पातळी वाढलेली होती. हा एक स्ट्रेस हार्मोन आहे. त्यामुळे जर नाश्ता टाळत असाल तर या स्ट्रेस हार्मोनमुळे नैराश्य, चिडचिड, राग, गाेंधळ उडणे अशा समस्याही जाणवू शकतात.
7 / 10
७. नाश्ता केला नाही तर शरीरातील ग्लुकोज पातळी कमी होत जाते. त्यामुळे वाढलेला Cortisol हार्मोन रक्तातील ग्लुकोज पातळी संतुलित ठेवण्यासाठी शरीरातील मांसपेशीमध्ये साठवलेले ग्लूकोज ओढायला सुरुवात करतो. वारंवार असेच होत गेल्यामुळे मग लवकर थकवा येणे, अशक्तपणा, रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे, उर्जा नसणे अशा समस्या निर्माण होतात.
8 / 10
८. हार्मोन्सचे असंतुलन होऊन टाईप २ डायबेटीज होण्याचा धोका वाढतो.
9 / 10
९. केस गळण्याचे प्रमाण खूप वाढते. कारण सकाळच्या वेळी पोटात अन्न न गेल्याने शरीरातील केरॅटिन निर्माण करण्याची प्रक्रिया मंदावते. नख, केस यांच्या आरोग्यासाठी केरॅटिन अतिशय आवश्यक आहे.
10 / 10
१०. नाश्ता न केल्याने दुपारी जेवणापर्यंत खूप भूक लागते. त्यामुळे मग खूप गडबडीत घाईघाईने खाल्ले जाते आणि बऱ्याचदा ओव्हरइटींग होते. याचा परिणाम वजन वाढण्यावर होऊ शकतो.
टॅग्स : आरोग्यहेल्थ टिप्समहिला