धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
Updated:November 2, 2025 18:04 IST2025-11-02T17:46:57+5:302025-11-02T18:04:30+5:30
कोणत्या गोष्टींमुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया...

आजकाल बहुतेक लोक चष्मा लावतात. डोळे दुखतात, अनेकांना डोळ्यांतून पाणी येतं किंवा जळजळ देखील होते. या लक्षणांकडे दुर्लक्ष करणं खूप धोकादायक असू शकते.
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या समस्या मोबाईल किंवा लॅपटॉप स्क्रीनकडे जास्त वेळ पाहणे, पौष्टिक गोष्टींची कमतरता किंवा झोपेचा अभाव यामुळे होतात. म्हणून तुम्ही डोळ्यांची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
बरेच लोक वारंवार संकेत दिसले तरीही या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. यामुळे नंतर ते दृष्टी गमावू शकतात. कोणत्या सवयींमुळे डोळ्यांना नुकसान होऊ शकतं ते जाणून घेऊया...
नॅशनल आय इन्स्टिट्यूटच्या एका रिपोर्टमध्ये असं सूचित केलं आहे की, स्क्रीन टाईममुळे डोळ्यांवर ताण पडतो. शहरातील तरुणांमध्ये ड्राय आईजची समस्या वाढली आहे.
मेडिकल रिपोर्टनुसार, प्रत्येकजण दिवसातून ६-८ तास त्यांचा मोबाईल फोन, लॅपटॉप किंवा टीव्ही स्क्रीनकडे पाहत राहतो, सतत स्क्रीन टाईममुळे आपला डोळे मिचकावण्याचा रेट कमी झाला आहे.
एअर कंडिशनर डोळ्यांसाठी हानिकारक आहे. ते झपाट्याने डोळ्यातील ओलावा कमी करतात, ज्यामुळे डोळे कोरडे होण्याचा धोका ५० टक्क्यांनी वाढतो.
झोपेचा अभाव हे देखील डोळ्यांच्या समस्यांना कारणीभूत ठरणारं एक कारण आहे. रात्रभर फोन वापरल्याने दृष्टी अंधुक होऊ शकते.
ओमेगा-३ फॅटी एसिड, व्हिटॅमिन ए आणि कमी पाणी प्यायल्यामुळे देखील डोळे ड्राय होऊ शकतात आणि दृष्टी कमजोर होते. म्हणून, तुमच्या डोळ्यांची जास्तीत जास्त काळजी घ्या आणि स्क्रीनवर जास्त वेळ घालवू नका.