अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

Published:October 15, 2023 04:07 PM2023-10-15T16:07:58+5:302023-10-15T16:14:11+5:30

Health Benefits Of Walking Barefoot : फक्त ९ दिवसाच्या नवरात्र उत्सवात अनवाणी चालू नका, नियमित अर्धा तास अनावणी चालून पाहा

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

उत्तम आरोग्यासाठी तज्ज्ञ आपल्याला चालण्याचा सल्ला देतात. दिवसातून किमान अर्धा ते एक तास चालल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. मात्र, धावपळीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणारे बरेच कमी आहेत. आता नवरात्रीचे दिवस सुरु झालेत. या नऊ दिवसात बरेच जण उपवास धरतात. अनवाणी चालतात. पण आपल्याला माहितीय का अनवाणी चालण्याचे देखील अनेक फायदे आहेत(Health Benefits Of Walking Barefoot ).

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

नियमित अनवाणी चालल्यामुळे डोळ्यांपासून ते ह्रदयापर्यंत त्याचा फायदा शरीराला होतो. जर आपल्याला तंदुरुस्त राहायचं असेल तर, नियमित थोडा वेळ का असेना अनवाणी चाला. अनवाणी चालण्याचे फायदे किती? अनवाणी चालणे आरोग्यासाठी खरंच फायदेशीर ठरते का? पाहूयात.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

बाहेर जाताना किंवा ऑफिसमध्ये असताना आपण शूज किंवा चप्पल घालून बसतो. यामुळे आपले पाय बांधून ठेवल्यासारखे राहतात. अशा स्थितीत मोकळ्या हवेत अनवाणी चालल्याने पायांना भरपूर ऑक्सिजन मिळते. रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे पायांचा थकवा व वेदना दूर होतात.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

अनवाणी चालल्याने सर्व स्नायू सक्रिय होतात. यासह पायांव्यतिरिक्त, त्यांच्याशी संबंधित शरीराचे सर्व अवयव सक्रिय होतात.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

अनवाणी चालत असताना पायाच्या बोटांचा खालचा भाग थेट जमिनीच्या संपर्कात येतो. ज्यामुळे सर्व अंगांचा एक्यूप्रेशरद्वारे व्यायाम होतो आणि अनेक आजारांपासून आराम मिळतो.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

अनवाणी जमिनीवर चालल्याने पायांद्वारे संपूर्ण शरीराला उर्जा मिळते. शिवाय नैसर्गिकरित्या शरीरात ऊर्जा टिकून राहते, व शरीराचे अवयव अधिक सक्रिय, सुडौल राहतात. यासोबतच शरीराचे रक्ताभिसरणही सुधारते.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

नियमित अनवाणी चालल्याने शरीरातील उर्जेची पातळी तर वाढतेच, शिवाय तणाव, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, निद्रानाश, हृदयाशी संबंधित समस्या, संधिवात, दमा, ऑस्टिओपोरोसिस या समस्या दूर राहतात.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

अनवाणी चालणे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. रिफ्लेक्सोलॉजी सायन्सच्या अहवालानुसार, जेव्हा आपण अनवाणी चालतो तेव्हा आपल्या पायांचा सर्वात जास्त दबाव बोटांवर पडतो. दुसऱ्या आणि तिसऱ्या बोटांमध्ये जास्तीत जास्त मज्जातंतूचा शेवट असतो, जो दृष्टीसाठी खूप फायदेशीर ठरते. त्यामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते.

अनवाणी चालण्याचे ७ भन्नाट फायदे, डोळ्यांपासून हृदयापर्यंत अनेक आजारांपासून मिळेल आराम

सकाळी उगवत्या सूर्यासोबत गवतावर किंवा जमिनीवर अनवाणी चालल्याने दिवस फ्रेश जातो. यासह व्हिटॅमिन डी देखील मिळते. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासोबतच व्हिटॅमिन डी आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करतात. या शिवाय अनवाणी चालल्यामुळे शरीराचे वजन नियंत्रणात राहते.