पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

Updated:August 29, 2025 17:19 IST2025-08-29T14:21:24+5:302025-08-29T17:19:04+5:30

Home Remedy For Piles : पाइल्सची सुरूवात बद्धकोष्ठतेपासून होते. भरपूर प्रमाणात पाणी न पिणे आणि पचनक्रिया खराब असणं याचं मुख्य कारण आहे.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

Home Remedy For Piles : मुळव्याध म्हणजेच (Piles) ही एक कॉमन आणि गंभीर समस्या आहे. जी खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे होते. तुम्ही जर नेहमीच जास्त तेलकट, मसालेदार, मैद्याचे आणि जड पदार्थ खात असाल, तर आपल्याला ही समस्या सहजपणे होऊ शकते. तसेच जर सतत बसून काम करावं लागत असेल आणि कोणत्याही प्रकारची फिजिकल अॅक्टिविटी करत नसाल तरीही तुम्हाला ही समस्या होऊ शकते.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

पाइल्सची सुरूवात बद्धकोष्ठतेपासून होते. भरपूर प्रमाणात पाणी न पिणे आणि पचनक्रिया खराब असणं याचं मुख्य कारण आहे. बद्धकोष्ठता जर वेळीच दूर झाली नाही तर ही समस्या पुढे पाइल्सचं रूप घेते. पाइल्स दोन प्रकारचा असतो. एक ज्यात मलद्वारात वेदना देणाऱ्या गाठी होतात, पण त्यातून रक्त येत नाही. तर दुसरा प्रकार म्हणजे ज्यात जखमा मलद्वाराच्या आत असतात आणि त्यात वेदनांसोबत रक्तही येतं.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

हावर्ड मेडिकल स्कूलमध्ये मेडिसीनचे सहाय्यक प्राध्यपक डॉ. हॉवर्ड लेविन म्हणाले की, पाइल्स ही समस्या जीवघेणी नाही. पण यावर उपचार आवश्यक आहे. मेडिकलमध्ये पाइल्सवर अनेक उपचार आहेत. पण तुम्ही काही घरगुती उपायांनीही ही वेदनादायी समस्या दूर करू शकता. चला जाणून घेऊ की, हार्वर्ड हेल्थनुसार या करावं.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

पाइल्समध्ये होत असलेली खाज आणि जळजळ यापासून सुटका मिळवण्यासाठी सिट्स बाथ घ्यावी. त्यासाठी एका टबमध्ये तीन ते चार इंच गरम पाणी घ्या आणि त्यात 10 ते 15 मिनिटांसाठी बसा. हे नियमितपणे करा याने तुम्हाला फायदा होईल.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

पाइल्स किंवा बद्धकोष्ठतेच्या रूग्णांनी आपल्या आहारात फायबरने युक्त भरपूर पदार्थांचा समावेश करावा. याने तुम्हाला विष्ठा पास करण्यास मदत मिळेल, ज्यामुळे पाइल्समधील रक्तस्त्राव आणि सूज कमी करण्यास मदत मिळते.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

तुम्ही ओवर-द-काउंटर क्रीमचा वापर करू शकता. याने सूज आणि खाजेतून आराम मिळेल. विज हेजल आरामदायक क्रीम आहे. ज्यात लिडोकेन, हाइड्रोकार्टिसोन, फिनाइलफ्राइन यांचा समावेश आहे.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

टॉयलेटमध्ये जास्त वेळासाठी बसण्याचा प्रयत्न करू नका. याने स्थिती आणखी जास्त बिघडू शकते. नेहमी बसताना एक पायरी असलेल्या किंवा पाय ठेवायची सोय असलेल्या स्टूलचा वापर करा. याने वेदनेतून आराम मिळतो आणि पोट साफ होण्यास मदत मिळते.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

रोजच्या आहारात फायबर असलेल्या फळांचा, भाज्यांचा आणि पदार्थांचा समावेश करा. त्याशिवाय चांगल्याप्रकारे हायड्रेटेड रहा. तुम्ही रोज सात ते आठ ग्लास पाणी प्यावं.

पाइल्सचा त्रास कमी करणारे सोपे घरगुती उपाय; सर्जरीची वेळ येण्यापूर्वी बदला ‘या’ सवयी

दरवेळी संडास करून आल्यावर मलद्वार बेबी वाइप किंवा गरम पाण्याच्या कापडाने हळूहळू साफ करा. जर तुम्हाला नंतर जळजळ होत असेल तर पेट्रोलिअम जेली किंवा अॅलोवेरा जेल लावा.