नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

Updated:March 17, 2026 17:34 IST2026-03-17T16:33:31+5:302026-03-17T17:34:47+5:30

Noodles ani bread-jam unhealthy snacks: Unhealthy food for kids Marathi: पाहूयात असे कोणते ५ पदार्थ आहेत जी मुलांसह आपलीही गट हेल्थ खराब करतात.

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

सकाळी घाईच्या वेळी मुलांची शाळा, ऑफिसची गडबड आणि घरातील कामे उरकत असताना आपण अनेकदा 'इन्स्टंट' पर्यायांकडे वळतो. 'दोन मिनिटांत तयार होणारे नूडल्स' किंवा 'ब्रेड-जॅम' हे पदार्थ दिसायला सोपे आणि चवीला छान वाटत असले तरी, डॉक्टरांच्या मते हे पदार्थ मुलांच्या पोटासाठी हळूहळू विषासारखे काम करत आहेत. (Noodles ani bread-jam unhealthy snacks)

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

आपण विसरतो की सकाळचा नाश्ता हा दिवसभराच्या ऊर्जेचा मुख्य स्रोत असतो.पण आपण सकाळीच मुलांच्या पोटात मैदा, साखर आणि प्रिझर्व्हेटिव्ह्ज (Preservatives) पदार्थ ढकलत असू, तर त्याचा परिणाम त्यांच्या पचनसंस्थेवर, एकाग्रतेवर आणि रोगप्रतिकारशक्तीवर होतो. यामुळे मुलांमध्ये वाढणारा लठ्ठपणा, बद्धकोष्ठता आणि वारंवार होणारे पोटाचे विकार यामागे इन्स्टंट नाश्ता कारणीभूत असतो. पाहूयात असे कोणते ५ पदार्थ आहेत जी मुलांसह आपलीही गट हेल्थ खराब करतात. (Unhealthy food for kids Marathi)

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

नूडल्स हा मैद्यापासून बनलेला पदार्थ, जो पचायला अतिशय जड असतो. त्यातील 'टेस्ट मेकर'मध्ये सोडियम आणि एम.एस.जी (MSG) चे प्रमाण जास्त असतं. यामुळे मुलांच्या किडनीवर आणि पचनावर ताण येतो. हे नूडल्स पोटाच्या आतल्या अस्तराला चिकटून राहतात, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होतो.

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

ब्रेडमध्ये इस्ट आणि मैदा असतो. तर जॅममध्ये फक्त साखर आणि कृत्रिम रंग असतात. या नाश्त्यातून मुलांना कमी फायबर आणि भरपूर कॅलरी मिळतात. ज्यामुळे रक्तातील साखर वेगाने वाढते आणि मुलांना पुन्हा भूक लागते.

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

बाजारात मिळणारे कॉर्नफ्लेक्स किंवा चोकोस हे फक्त साखरेचे गोळे असतात. यात असणारी अति साखर मुलांमध्ये हायपर- ऍक्टिव्हिटी वाढते. ज्यामुळे मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

रियल फ्रुट ज्यूसमध्ये फळं कमी आणि साखरेचे पाणी जास्त असते. फळांमधील नैसर्गिक फायबर निघून गेल्यामुळे हे ज्यूस फक्त पोटाचा घेर वाढवण्याचं काम करतात.

नूडल्स की ब्रेड-जॅम? सकाळचा मुलांच्या आवडीचा नाश्ता पोटासाठी ठरतोय 'विष', नका देऊ ५ पदार्थ

जे पदार्थ आपण फक्त तळून मुलांना देतो, त्यात प्रिझर्व्हेटिव्ह्जचे प्रमाण जास्त असते. हे पदार्थ वारंवार खाल्ल्याने मुलांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकाराच्या समस्या लहान वयातच दिसू शकतात.