फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

Updated:November 25, 2025 20:14 IST2025-11-25T19:59:48+5:302025-11-25T20:14:41+5:30

Foods dangerous for the liver : these 5 foods are dangerous for the liver eating them cause fatty liver : लिव्हर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ सर्वात जास्त नुकसानदायक पाहा...

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

फॅटी लिव्हर ही आजच्या काळातील फारच कॉमन समस्या बनली आहे. चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी, ताणतणाव, अनियमित झोप आणि व्यायामाचा अभाव यामुळे लिव्हरवर चरबी साचू लागते आणि यावर योग्य (these 5 foods are dangerous for the liver eating them cause fatty liver) काळजी न घेतल्यास गंभीर आजारांचा धोका वाढतो. यासाठीच, आहारातील काही हानिकारक पदार्थ पूर्णपणे टाळल्यास फॅटी लिव्हरच्या समस्येवर नियंत्रण मिळवणे शक्य होते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

लिव्हरवर अतिरिक्त चरबी जमा झाल्यामुळे अनेक आरोग्यविषयक अडचणी (Foods dangerous for the liver) निर्माण होऊ शकतात, ज्या कालांतराने अधिक गंभीर रूप धारण करतात. निरोगी लिव्हर हे आपल्या शरीराच्या चयापचय क्रियेसाठी आणि विषारी पदार्थ बाहेर टाकण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

आपल्याला आवडणारे काही पदार्थ नकळतपणे आपल्या लिव्हरला हानी पोहोचवतात. आपण अशा ५ खाद्यपदार्थांविषयी जाणून घेणार आहोत, जे फॅटी लिव्हरची समस्या वाढवतात किंवा त्याला कारणीभूत ठरतात. लिव्हर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी कोणते पदार्थ सर्वात जास्त नुकसानदायक आहेत हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या पदार्थांची माहिती घेऊन त्यांना आपल्या आहारातून वगळणे किंवा ते खाण्याचे प्रमाण कमी करणे हे लिव्हरच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

भारतात नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज (NAFLD) चे प्रमाण खूप वाढले आहे. काही अभ्यासांनुसार भारतात ३८.६% वृद्ध तर ३५.४% लहान मुले या फॅटी लिव्हरच्या समस्येने त्रस्त आहे. कारण ही समस्या थेट लठ्ठपणा आणि मधुमेह यांसारख्या लाइफस्टाइलशी संबंधित आजारांशी जोडलेली आहे.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

जास्त साखरयुक्त किंवा गोड पदार्थ लिव्हरमध्ये चरबी साठण्यास कारणीभूत ठरतात, आणि इन्सुलिन रेजिस्टन्स वाढवते. केक, पेस्ट्री, चॉकलेट, मिठाई असे गोडाधोडाचे पदार्थ खाण्याचे प्रमाण कमी करणे गरजेचे असते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

तळलेले पदार्थ, पिझ्झा, पॅटीज, समोसे, बर्गर यातील ट्रान्स-फॅट लिव्हरवर चरबीची लेयर वाढवते, ज्यामुळे फॅटी लिव्हरची समस्या होऊ शकते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

कोल्डड्रिंक, एनर्जी ड्रिंक किंवा पॅकेज्ड ज्यूसमध्ये हाय फ्रुक्टोज असते, जे फॅटी लिव्हरची समस्या वाढवण्यास कारणीभूत ठरते. विशेषतः फ्रुक्टोजचे थेट चरबीत रूपांतरित होते आणि चरबी लिव्हरवर जमा होते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

ब्रेड, नूडल्स, पाव, पिझ्झा बेस, बिस्किट्स यामुळे ब्लड शुगर अचानक वाढते आणि चरबी लिव्हरमध्ये साचते.

फक्त 'या' ५ प्रकारच्या पदार्थांना कायमच करा गुडबाय! फॅटी लिव्हरचा त्रास होणारच नाही...

पॅकेज्ड आणि कॅन केलेले खाण्याचे पदार्थ, फ्रोझन फूड्स आणि प्रोसेस्ड फूडमध्ये सहसा सोडियमचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे फ्लुईड रिटेन्शन होऊ शकते आणि लिव्हरला नुकसान होऊ शकते.