कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

Updated:December 1, 2025 20:00 IST2025-12-01T20:00:00+5:302025-12-01T20:00:07+5:30

food to reduce cholesterol : 7 foods in your daily diet that lower cholesterol : foods to control bad cholesterol : कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी ‘गुड कोलेस्टेरॉल-फ्रेंडली’ पदार्थ कोणते, जे आहारात नेहमीच असायला हवेत...

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

आजकाल चुकीचा आहार, बैठी जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे शरीरातील कोलेस्टेरॉलची (7 foods in your daily diet that lower cholesterol) पातळी झपाट्यानं वाढते. कोलेस्टेरॉल वाढणे म्हणजे अनेक आरोग्याच्या समस्यांना निमंत्रणच (food to reduce cholesterol) असते. हृदयविकार, ब्लॉकेज, रक्तदाब वाढणे यांसारख्या धोक्यांची शक्यता अधिक वाढते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

चुकीचा आहार, जास्त तेलकट पदार्थ, कमी हालचाल या सवयींमुळे शरीरातील (foods to control bad cholesterol) वाईट कोलेस्टेरॉलचे प्रमाण सहज वाढते. परंतु एक चांगली गोष्ट म्हणजे योग्य आहाराच्या मदतीने ते नियंत्रणात ठेवता येते. दररोजच्या जेवणात काही नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास कोलेस्टेरॉल हळूहळू कमी होतो आणि हृदय अधिक निरोगी राहते. कोणते आहेत हे ‘गुड कोलेस्टेरॉल-फ्रेंडली’ पदार्थ, ते पाहूयात.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

धण्याच्या दाण्यांमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर जमा झालेले विषारी पदार्थ शरीरा बाहेर काढतात आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात. भिजवलेल्या धण्याचे पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यायल्याने बद्धकोष्ठतेसोबतच खराब कोलेस्टेरॉल देखील कमी होते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

लसूण नैसर्गिक पद्धतीने कोलेस्टेरॉल - कमी करणारा सर्वात उत्तम पदार्थ म्हणून ओळखले जाते. यात ॲलिसिन (Allicin) नावाचा एक महत्त्वाचा घटक असतो, जो रक्तवाहिन्यांमध्ये फॅट जमा होण्यापासून थांबवतो आणि हार्ट ब्लॉकेज होण्याचा धोका कमी करतो. रोज सकाळी १ ते २ लसणाच्या पाकळ्या खाणे खूप फायदेशीर ठरते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

दालचिनी शरीरात फॅट ब्रेकडाऊन होण्याची प्रक्रिया अधिक वेगवान करते. दालचिनी इन्सुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवते आणि खराब कोलेस्टेरॉल कमी करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास फायदेशीर ठरते. दालचिनीची पूड गरम पाणी किंवा चहा सोबत घेऊ शकता.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

अळशीच्या दाण्यांमध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि सोल्युबल फायबर असतात. हे दोन्ही घटक रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेले कोलेस्टेरॉल बर्फासारखे वितळवून बाहेर काढण्यास मदत करतात. रोज सकाळी जवसाची पावडर नाश्त्यात मिसळून खाणे खूप फायदेशीर मानले जाते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

काळ्या चण्यामध्ये भरपूर प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्स असतात, जे लिपिड प्रोफाइल संतुलित ठेवतात. भिजवलेले काळे चणे सकाळी खाल्ल्याने कोलेस्टेरॉल आणि वजन दोन्ही नैसर्गिकरित्या नियंत्रित राहते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

लिंबूमध्ये असलेले साइट्रिक ॲसिड जमा झालेले फॅट वितळवून बाहेर काढण्यास मदत करते. कोमट पाण्यात लिंबू मिसळून रोज पिण्याने शरीर डिटॉक्स होते आणि कोलेस्टेरॉल कमी होण्यास लागते.

कोलेस्टेरॉल कमी करणारे रोजच्या आहारातलेच ७ पदार्थ, महिन्याभरात दिसेल फरक - टळेल धोका...

जेवण तयार करण्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा वापर करु शकता. यात असलेले ओमेगा-३, मोनोअनसॅचुरेटेड फॅट आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म हृदयाला मजबूत ठेवतात आणि कोलेस्टेरॉलला नियंत्रित करतात.