शुगर वाढून गोळी घेणं नको असेल तर आहारात हवेच ५ पदार्थ, डायबिटीस होण्याचा धोका होतो कमी
Updated:June 15, 2025 15:36 IST2025-06-15T14:07:43+5:302025-06-15T15:36:51+5:30
food to control sugar level - If you don't want to take pills due to high sugar levels, then you should eat 5 foods in your diet, the risk of developing diabetes will be reduced : रक्तातील साखरेचे प्रमाण आटोक्यात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात हे पदार्थ. पाहा कोणते आहेत. आहारात नक्कीच असायला हवे.

सध्या वाढत चाललेल्या काही शारीरिक समस्यांपैकी एक म्हणजे मधुमेह.डायबिटीसचा त्रास अनेकांना असतो. साखर खाणे बंद करणे हा एकच उपाय त्यावर असू शकत नाही. त्यासाठी इतरही काही कृती करणे गरजेचे आहे.
आजकाल तरुण मुला-मुलींनाही मधुमेहाचा त्रास होतो. कारणे अनेक आहेत. त्यासाठी उपाय करणे मात्र गरजेचे असते. योग्य वेळी उपाय केले तर रक्तातील साखरेचे वाढते प्रमाण आटोक्यात आणता येते. त्यासाठी पदार्थांचा आहारात समावेश करा.
रोज रात्री एक चमचा मेथी पाण्यात भिजवून सकाळी खाल्ले तर ब्लड शुगर नियंत्रित राहते. मेथीचे दाणे आहारात असणे नक्कीचे फायद्याचे ठरेल.
जांभळाचा गर आणि जांभळाची बी सुद्धा मधुमेहावर फायद्याची ठरते. जांभळाच्या बियांची पूड बाजारात मिळते. त्यावर खास डायबिटीससाठी असेही लिहिलेले असते. जांभळाचे फळ खावे.
गाजर खाणे आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. त्याच प्रमाणे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी गाजर खाणे फायद्याचे ठरते.
लसणाच्या पाकळ्या खाणे उपयुक्त ठरेल. आहारात लसणाचा समावेश असावा. फोडणी, चटणी, आमटी, डाळ, भाजी आदी पदार्थांमध्ये लसणाच्या पाकळ्या घालाव्यात.
कडधान्ये आहारात असणे आरोग्यासाठी फार फायद्याचे असते. त्यामुळे रोजच्या जेवणात कडधान्ये असायला हवी. मात्र कडधान्ये फक्त शक्तीवर्धक नसतात तर त्यामुळे रक्तातील साखरही नियंत्रित राहते.