ऑफिस आणि घरची जबाबदारी पेलताना दमछाक होतेय? ४ टिप्स, स्ट्रेस कमी होऊन मिळेल मन:शांती
Updated:January 19, 2026 13:33 IST2026-01-19T13:20:40+5:302026-01-19T13:33:47+5:30
रोज स्ट्रेस घेऊन जगणं सोपं नाही, म्हणून हे काही उपाय

आजच्या धावपळीच्या जीवनात कॉर्पोरेट ऑफिसमध्ये कामाचा व्याप खूप वाढू लागला आहे, ज्याचा वाईट परिणाम तुमच्या मानसिक आरोग्यावर होतो. ऑफिसचं टेन्शन सतत जाणवत राहतं.
कधीकधी तर ऑफिसची वेळ संपल्यानंतरही काम दिवसभर सुरूच असते. यामुळे नैराश्य देखील मोठ्या प्रमाणात जाणवू लागते. घर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणच्या जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात.
अनेक लोक दीर्घकाळ मानसिक आणि शारीरिक तणावाचा सामना करतात आणि त्यातून त्यांची सुटका होत नाही. घर आणि ऑफिसच्या जबाबदाऱ्या मिळून तणाव खूप वाढवतात.
जर तुम्ही देखील या परिस्थितीतून जात असाल आणि तुम्हाला अजिबात आराम मिळत नसेल, तर आज आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. या टिप्स फॉलो करून तुम्हाला तणावापासून सुटका करू शकता.
डीप ब्रीदिंग एक्सरसाइज
जर तुम्ही ऑफिसचे टेन्शन आणि वर्क लोडमुळे खूप त्रस्त असाल आणि तुम्हाला सतत तणाव जाणवत असेल, तर आराम मिळवण्यासाठी तुम्ही दररोज 'डीप ब्रीदिंग' एक्सरसाइज करू शकता. हे तुमच्या हृदयाचे ठोके आणि ब्लड प्रेशर संतुलित ठेवून मनाला शांती देईल.
पुरेशी झोप
जीवन आनंदी ठेवण्यासाठी आणि स्वतःला आजार व मानसिक तणावापासून दूर ठेवण्यासाठी पुरेशी झोप घेणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही दररोज ७-८ तासांची झोप घेतलीच पाहिजे. जर तुम्ही पुरेशी झोप घेतली, तर तुम्ही तणावापासून खूप दूर राहू शकता.
कामादरम्यान ब्रेक घ्या
तुम्ही सतत कामातच गुंतून राहू नये. कामाच्या मधल्या काळात छोटे छोटे ब्रेक घेत राहावे. सतत काम केल्याने किंवा सतत टेन्शन घेतल्याने समस्या अधिक वाढू लागते.
सकस आहार
काही लोक तणावामुळे फास्ट फूडकडे वळतात, ज्यामुळे तणाव आणि आजार शरीराला ग्रासू लागतात. तुम्ही तुमच्या आहारात नेहमी सकस आणि पौष्टिक पदार्थांचाच समावेश केला पाहिजे.