चष्मा लागला? रोज 'हा' १ पदार्थ खा, चष्म्याचा नंबर होईल कमी, आचार्य बाळकृष्णांचा सल्ला
Updated:August 30, 2025 19:50 IST2025-08-30T18:45:20+5:302025-08-30T19:50:57+5:30
Eat Funnel To Improve eyesight : बडीशेपेत व्हिटामीन ए, एंटीऑक्सिडेंट्स असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.

आजकाल लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकालाच चष्मा असतो. चुकीची लाईफस्टाईल आणि चुकीचं डाएट यामुळे डोळे अधिकच खराब होऊ लागले आहेत. आहारात पोषक तत्वांची कमतरता डोळे खराब होण्याचं कारण ठरते.
यात काही खास व्हिटामीन्स जसं की व्हिटामीन ए, सी, ई, जिंक यांसारखी पोषक तत्व असतात ज्यामुळे डोळे चांगले राहतात.
आयुर्वेदीक एक्स्पर्ट्स आचार्य बाळकृष्ण यांनी डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत. ज्यामुळे फक्त डोळे चांगले राहत नाही तर डोळ्याची जळजळही कमी होण्यास मदत होते.
आचार्य बाळकृष्ण सांगतात की बडीशेपेचं चूर्ण सकाळी जेवणाआधी साध्या पाण्यासोबत घेतल्यानं अंधूक दिसणं बंद होतं आणि डोळे चांगले राहण्यास मदत होते. बडीशेपेचे चूर्ण डोळे चांगले ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं.
बडीशेपेत व्हिटामीन ए, एंटीऑक्सिडेंट्स असतात जे डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते. याव्यतिरिक्त यात आयर्न, कॅल्शियम आणि व्हिटामीन सी असते ज्यामुळे ओव्हर ऑल आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. बडीशेपेत व्हिटामीन सी, कॅल्शियम, आयर्न आणि एंटी ऑक्सिडेंट्स असतात. व्हिटामीन ए डोळ्यांसाठी फायदेशीर ठरते.
व्हिटामीन ए च्या कमतरतेनं रात्री दिसण्यास त्रास होतो. आयुर्वेदात बडीशेप डोळ्यांसाठी वरदान मानली जाते. बडीशेप डोळ्यांची हरवलेला प्रकाश परत आणण्यास मदत करते.
याशिवाय बडीशेपेच्या सेवनानं पचनक्रिया चांगली राहण्यासाठी मदत करते.
बडीशेपेचे नियमित सेवन केल्यानं पचनाचे बरेच त्रास दूर होतात. जेवल्यानंतर बडीशेप खाल्ल्यानं पोट साफ होणं सोपं होतं.