पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

Updated:June 16, 2025 18:23 IST2025-06-16T18:16:24+5:302025-06-16T18:23:15+5:30

dry ginger for health, use during the monsoon season, apply dry ginger paste - monsoon diseases : आरोग्यासाठी फायद्याचा लेप. पाहा सुंठीचा वापर पावसाळ्यात कसा करावा.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

आलं आरोग्यासाठी फार चांगलं असतं. हे आपल्याला माहिती आहेच. आहारामध्ये आल्याचा समावेश असणे फार फायद्याचे ठरते. भाजीत, आमटीत सगळ्यात आलं आपण घालतो. आल्याचा काढा तसेच आल्याचा चहा आरोग्यासाठी फार चांगला.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

पण कधी सुंठ वापरता का? आले वाळवून त्याची सुंठ तयार केली जाते. ही सुंठ आल्यापेक्षा जास्त आरोग्यदायी असते. अनेकदृष्ट्या उपयुक्त ठरणारी सुंठ पावसाळ्यात तर घरी वापरायलाच हवी.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

पावसाळ्यात आल्याचा चहा तर पिताच मात्र सुंठीचा छान कडक चहा पावसाळ्यात पिणे फार फायद्याचे ठरेल. सर्दी खोकला ताप पावसाळ्यात नुसता थैमान घालतात. सुंठीचा चहा प्यायल्याने आजार आटोक्यात राहतात.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

सुंठ उगाळून त्याचा लेप तयार करता येतो. हा लेप फार उपयुक्त असतो. अगदी गुणकारी असतो. त्यामुळे तो वापरणे आरोग्यासाठी फायद्याचे ठरेल. पाहा किती फायदे असतात.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

सुंठीत अँण्टी इन्फ्लेमेटरी घटक असतात. ते वेदनाशामक असतात. त्यामुळे सुंठीचा लेप लावल्यामुळे हात, मान दुखत असल्यास आराम मिळतो. हा लेप स्नायूंसाठी फार उपयुक्त ठरतो.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

वाताचा त्रास अनेकांना असतो. वातामुळे डोके दुखते. तसेच इतरही अनेक त्रास होतात. सुंठीचा लेप वात खेचून घेतो. तसेच पित्ताचा त्रास होत असेल तरी हा लेप डोकेदुखी थांबवण्यात मदत करतो.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

सुंठीच्या लेपामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारते. प्राणवायु शरीराला जास्त मिळतो आणि त्यामुळे थकवा जास्त जाणवत नाही. त्यामुळे सर्दीने नाक बंद झाल्यावर असा लेप लावायचा. नाक सुटते.

पावसाळ्यात सुंठ म्हणजे रामबाण औषध, सुंठ लेप लावा-पावसाळी आजार राहतील लांब-झोपही लागेल गाढ

सुंठीचा लेप तयार करायला अगदी सोपा आहे. त्यासाठी सुंठ उगाळायची. उगाळण्यासाठी पाणी वापरायचे. सुंठ पूड असेल तर थोड्या पाण्यात कालवायची आणि लावायची. हा लेप खास डोक्यालाच लावला जातो. झोपही छान लागते.