Join us

कोरडा खोकला त्रास देतोय ? ७ सोपे घरगुती उपाय, खोकल्याचा त्रास होईल कमी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2022 13:48 IST

1 / 8
बदलत्या हवामानामुळे विविध आजार शरीरात उद्भवतात. हिवाळ्यात सर्दी, खोकला, ताप याचा अधिक त्रास होतो. खोकल्याचे दोन प्रकार आहेत. ओला खोकला आणि कोरडा खोकला. कोरडा खोकला अधिक त्रास देतो. याच्यावर योग्य वेळेवर उपचार नाही घेतले तर खोकला अधिक बळावतो. खोकल्याला सामान्य आजार समजून दुर्लक्ष करू नका. याच निष्काळजीपणामुळे गंभीर आजारांची लागण होण्याची शक्यता असते. आजारांना स्वतःपासून दूर ठेवण्यासाठी आपल्या आहारामध्ये पौष्टिक पदार्थांचा समावेश करा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा.
2 / 8
आल्यामध्ये अनेक गुणकारी तत्वे आहेत. जे खोकला कमी करण्यासाठी नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात. आल्याचा छोटा तुकडा बारीक कुटून घ्या आणि त्यामध्ये चिमूटभर मीठ मिक्स करा. हे मिश्रण आता आपल्या दाढेखाली ठेवा आणि त्याचा रस हळूहळू घशामध्ये उतरू द्या. पाच मिनिटांनंतर आले बाहेर फेका आणि कोमट किंवा साध्या पाण्याने गुळण्या करा.
3 / 8
कोरड्या खोकल्यावर रामबाण उपाय म्हणजे मध. मधामुळे घश्यात होणारी खवखव कमी होते. एका छोट्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे मध मिक्स करा. मध आणि पाणी नीट मिक्स झाल्यानंतर ते प्या. नियमित हा उपाय केल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळेल.
4 / 8
हळदीचे दूध नियमित प्यायल्याने शरीरातील अनेक आजार दूर होतात. हळदीमध्ये कर्रक्युमिन नावाचे घटक असते. या घटकामुळे सर्दी, खोकला आणि श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो. एक ग्लास दुधामध्ये अर्धा चमचा हळद मिक्स करून प्या. कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसांत कमी होईल.
5 / 8
साखरेपेक्षा गूळ गुणकारी असल्याचे मानले जाते. अनेक पदार्थांमध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर अधिक केला जातो. सर्दी आणि खोकल्यावर गूळ खाणे हा प्रभावी उपाय आहे. कोमट पाण्यामध्ये गूळ पावडर मिक्स करा आणि प्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार प्रमाण आणि दिवसातून किती वेळा हा उपाय करावा याबाबत सल्ला घ्यावा.
6 / 8
मीठ अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांनी परिपूर्ण असतं जे घशातील व तोंडातील बॅक्टेरिया मारण्यास व ओरल हेल्थ जपण्यास मदत करतं. एका मोठ्या ग्लासमध्ये कोमट पाणी घ्या आणि त्यामध्ये एक चमचा मीठ मिक्स करा. या पाण्याने गुळण्या करा. दिवसातून दोन वेळा हा उपाय करावा. खोकला आणि घशातील खवखव कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे.
7 / 8
संत्री हा फळ आपण कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. संत्र्याचा रस शरीरासाठी खूप उपयुक्त आहे. संत्र्याच्या रसमध्ये १ चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी मिसळून पिऊ शकता. जे खोकला कमी करण्यास मदत करेल
8 / 8
हिवाळ्यात तूप अधिक खावे. तूप त्वचेला तजेलदार बनवतात. तुपात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात जे घसा स्वच्छ ठेवतात. काळी मिरी पावडर तुपात मिसळून खाल्ल्यास कोरड्या खोकल्यापासून आराम मिळतो.
टॅग्स : थंडीत त्वचेची काळजीहेल्थ टिप्सलाइफस्टाइल