डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

Updated:August 9, 2025 13:54 IST2025-08-08T18:17:40+5:302025-08-09T13:54:42+5:30

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

भारतामध्ये हृदयरोगाचं प्रमाण खूप जास्त वाढत आहे. त्यामुळेच तर अगदी तरुण लोकांना हार्ट ॲटॅक आल्याचं आपण नेहमीच ऐकतो.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

अभिनेत्री माधुरी दीक्षितचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी भारतामध्ये हृदयराेग का वाढतो आहे, याविषयीचे काही मुद्दे त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले आहेेत. ते म्हणतात की आपल्याकडे जी Always On कार्यपद्धती रुजत चाललेली आहे, तिचा खूप वाईट परिणाम तरुणांच्या आरोग्यावर होत आहे.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

Always On कार्यपद्धती म्हणजे आजची तरुणाई रात्रंदिवस स्क्रिनवर अलर्ट असते. रात्र आणि दिवस यांच्यातला फरक ते मिटवत चालले आहेत. त्यामुळे शरीराला पुरेसा आराम मिळत नाही आणि स्ट्रेस लेव्हल वाढत जाते.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

भारतात हृदयरोग वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे व्यायाम किंवा शारिरीक हालचाली करण्याचं प्रमाण खूप कमी झालं आहे. ICMR–INDIAB यांच्या अहवालानुसार तर ३७ टक्के प्रौढ भारतीय व्यक्ती शरीरासाठी जेवढ्या गरजेच्या असतात तेवढ्या कमीतकमी हालचालीही करत नाहीत.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

आठवड्यातून किमान तीन दिवस वर्कआऊट करणं गरजेचं आहे. काही जण ते करतात पण बाकीचे दिवस ते सतत बसून काम करत असतात. वर्क आऊटचे तास आणि बैठ्या कामाचे तास यांचं गणित जुळत नाही. त्यामुळे शरीराला पुरेसा व्यायाम होत नाही आणि हृदयरोगाचं प्रमाण वाढत जातं.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

भारतातल्या लोकांचा स्क्रिन टाईम प्रचंड वाढलेला आहे. ७. ३ एवढा भारतीयांचा ॲव्हरेज स्क्रिन टाईम आहे. याचाही परिणाम आरोग्यावर आणि हृदयावर होतोच, असं डॉ. नेने सांगतात.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

कामाचा ताण प्रचंड वाढलेला आहे. त्यामुळे स्ट्रेस वाढतो. स्ट्रेस वाढला की शरीरातल्या कॉर्टिसोल हार्मोन्सचे प्रमाण वाढते. त्याचा वाईट परिणाम हृदयावर होतो.

डॉ. श्रीराम नेने सांगतात भारतीय लोकांच्या 'या' सवयींमुळेच वाढतोय तरुणांमध्ये हृदयरोग, आजारी तारुण्याची तगमग

रात्री झोपण्याच्या आणि सकाळी उठण्याच्या वेळा ठरलेल्या नसणे, नेहमीच अपुरी झोप घेणे हे देखील हृदयरोगाचे एक महत्त्वाचे कारण ठरते.