Join us

तुम्हालाही सतत गोड खाण्याची इच्छा होतेय का? शरीरात 'या' व्हिटॅमिनची असेल कमतरता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 17:15 IST

1 / 9
अनेक वेळा माणसाला गोड खाण्याची इच्छा होते. पण असं जर वारंवार घडत असेल तर ते नेमकं का घडत आहे याचा देखील विचार करायला हवा.
2 / 9
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शरीरात काही व्हिटॅमिन्सची कमतरता असल्यास व्यक्तीला गोड खावंसं वाटू लागतं. कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होऊ शकतं हे जाणून घेऊया...
3 / 9
जर तुमच्या शरीरात व्हिटॅमिन बी म्हणजेच B1 (थियामिन), B3 (नियासिन), B5 (पॅन्टोथेनिक ऍसिड), B6 ​​(पायरीडोक्सिन) ची कमतरता असेल तर तुम्हाला गोड खाण्याची इच्छा होईल.
4 / 9
जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर तुम्हाला मिठाई किंवा गोड पदार्थ पुन्हा पुन्हा खावेसे वाटतात.
5 / 9
एखाद्या व्यक्तीच्या ब्लड शुगर लेव्हलमध्ये चढ-उतार असल्यास गोड खाण्याची इच्छा वाढते.
6 / 9
एखाद्या व्यक्तीचे हार्मोन्स असंतुलित असल्यास त्याचे परिणाम शरीरावर दिसून येतात. त्यामुळे देखील अशी इच्छा वाढू शकते.
7 / 9
एखाद्या महिलेला मासिक पाळी आणि मेनोपॉज दरम्यान गोड खावंसं वाटू शकतं.
8 / 9
जास्त गोड खाणं हे शरीरासाठी घातक ठरू शकतं. यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब आणि लठ्ठपणासारखे धोकादायक आजार होऊ शकतात.
9 / 9
बहुतेक लोकांना असं वाटतं की साखरच गोड असते. हे पूर्णपणे खरं नसलं तरी दैनंदिन जीवनात साखरेव्यतिरिक्त कोल्ड्रिंक्स, कुकीज, बिस्किटे आणि ब्रेड यांसारख्या गोष्टींमध्येही भरपूर साखर असते.