Diabetes Signs in Kids : मुलांनाही डायबिटिसचा धोका-ओळखा ७ लक्षणं, मुलांचं वजन वाढत असेल तर व्हा सावध
Updated:June 11, 2025 09:05 IST2025-06-11T09:00:00+5:302025-06-11T09:05:02+5:30
Diabetes signs in kids: 7 diabetes symptoms: gaining weight is diabetic symptoms : सध्या मधुमेहाचा आजार झपाट्याने वाढत आहे. लहान मुले देखील याला बळी पडताय. याकडे दुर्लक्ष करणे प्राणघातक ठरु शकते. मधुमेहाची लक्षणे कशी दिसतात पाहूया.

मधुमेहाचा आजार कोणत्याही वयात होऊ शकतो. बिघडलेली जीवनशैली, खाण्याच्या चुकीच्या सवयी, लठ्ठपणा इत्यादींमुळे होऊ शकतो. काही वेळा हा आजार आनुवंशिक कारणांमुळेही होतो.(Diabetes signs in kids)
जर घरात मधुमेहाचा आजार कोणाला असेल तर मुलांना देखील होण्याची दाट शक्यता असते. मधुमेहाची लक्षणे मुलांमध्ये कशी ओळखायची पाहूया. (7 diabetes symptoms)
जेव्हा शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढते तेव्हा मूल सामान्यपेक्षा जास्त वेळा लघवी करते.
वारंवार लघवी झाल्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. ही कमतरता पूर्ण करण्यासाठी मुलांना सतत तहान लागते.
योग्य आहार घेऊन किंवा जास्त प्रमाणात खाल्ल्यानंतरही बाळाचे वजन कमी होत असेल तर सावध रहा, मधुमेहाचा आजार असू शकतो.
रक्तातील साखरेची प्रमाण वाढल्यामुळे मुलांची ऊर्जेची पातळी कमी होते. त्यामुळे त्यांना थकवा आणि अशक्तपणा जाणवू लागतो.
मधुमेहाचा मुलांच्या डोळ्यांवरही परिणाम होतो. ज्यामुळे त्यांना धूसर दिसते.
खेळताना लागल्यास किंवा पडल्यास दुखापत लवकर बरी होत नसेल तर हे मधुमेहाचे लक्षण समजावे, अशावेळी डॉक्टरांचे मत घ्या.