'या' आजारामुळे तोंडाला सतत दुर्गंधी येते! एक्सपर्ट सांगतात त्याकडे दुर्लक्ष नकोच, कारण....
Updated:August 30, 2025 17:01 IST2025-08-30T16:41:59+5:302025-08-30T17:01:38+5:30

दात, जीभ, हिरड्या यांची व्यवस्थित स्वच्छता ठेवली नाही तर तोंडातून घाण वास येतो, हे आपल्याला माहितीच आहे.
पण काहीजणांच्या बाबतीत असंही होतं की ते मौखिक आरोग्याची चांगली काळजी घेतात पण तरीही तोंडातून येणारा घाण वास काही कमी होत नाही.
यामागे एक अतिशय महत्त्वाचं कारण असतं आणि ते कारण कोणतं याविषयीची माहिती तज्ज्ञांनी nutrilicious.byritajain याइंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
यामध्ये एक्सपर्ट असं सांगतात की तोंडातून सतत दुर्गंधी येत असेल तर त्याचा संबंध थेट तुमच्या पचनक्रियेशी असतो.
जर पचनासाठी मदत करणारे गूड बॅक्टेरिया कमी झाले आणि बॅड बॅक्टेरियाचं प्रमाण वाढलं तर अन्नपचन व्यवस्थित होत नाही.
अपचनाचा हा त्रास वारंवार होणं चांगलं नाही. कारण भविष्यात त्यातून मोठे गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे या त्रासाकडे दुर्लक्ष न करता त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या, असं तज्ज्ञ सांगतात.