हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

Updated:May 19, 2025 16:16 IST2025-05-19T16:09:58+5:302025-05-19T16:16:59+5:30

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

हल्ली कमी वयातच हृदयविकाराचा त्रास होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळेच तर कमी वयात हृदय विकाराचा झटका येण्याची कित्येक उदाहरणे आपण आपल्या आजुबाजुला पाहात आहोत..

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

आपली बदललेली जीवनशैली यासाठी प्रामुख्याने जबाबदार आहे, असं तज्ज्ञ नेहमीच सांगतात. खाण्यापिण्याच्या पदार्थांमध्ये, सवयींमध्ये झालेले बदल, व्यायामाचा अभाव हे सुद्धा हृदयविकाराचे एक प्रमुख कारण आहेच..

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

त्यामुळेच जर आपल्या काही सवयी बदलल्या आणि काही गोष्टी आवर्जून केल्या तर कमी वयात हृदय विकाराचा त्रास होण्याचा धोका बराच कमी होऊ शकतो, अशी हृदयरोग तज्ज्ञ डॉ. जॅक वॉल्फसन यांनी दिलेली माहिती हिंदुस्थान टाईम्सने प्रकाशित केली आहे. त्या सवयी नेमक्या कोणत्या ते पाहूया..

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

स्वच्छ, मोकळ्या हवेत जाऊन केलेल्या व्यायामामुळे हृदयविकाराचा धोका कमी होऊ शकतो. त्यामुळे आठवड्यातून दोन दिवस तरी सायकलिंग, रनिंग, वॉकिंग, जाॅगिंग, स्विमिंग असे मोकळ्या हवेतले व्यायाम करायला हवे.

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

पुरेशी झोप हा एक हल्ली मोठाच चिंतेचा विषय झाला आहे. अपुरी झोप अनेक आजारांना अतिशय छुप्या पद्धतीने आमंत्रण देणारी आहे. त्यामुळे झोपेचा खेळ नको. रोज रात्री लवकर झोपा आणि पुरेशी झोप घेऊन सकाळी लवकर उठा, असं तज्ज्ञ सांगतात.

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

पायात चपला न घालता म्हणजेच barefoot या पद्धतीने मातीवर काही पावलं रोज चालायला हवं. यामुळे पायातले काही प्रेशर पॉईंट दबले जातात जे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असतात.

हार्ट ॲटॅकचा धोका कमी करणाऱ्या ५ गोष्टी! तज्ज्ञ सांगतात कमी वयात हृदयविकार नको तर..

कामाचा ताण किंवा कोणत्या ना कोणत्या प्रकारचा ताण प्रत्येकाच्याच मागे आहे. सतत तणावात राहाणे, आरोग्यासाठी अजिबातच चांगले नाही. त्यामुळेच स्ट्रेस लेव्हल कमी होऊन मूड चांगला होण्यासाठीही प्रयत्न करणं गरजेचं आहे. यासाठी डाॅक्टरांनी “At least once a day, give thanks to God” हा उपाय सांगितला आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने मन शांत करण्याचा प्रयत्न करू शकता.