फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

Updated:March 29, 2025 17:37 IST2025-03-29T17:28:53+5:302025-03-29T17:37:04+5:30

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

हल्ली कमी वयातच अनेक जणांना गुडघेदुखी, कंबरदुखी, पाठदुखी असा त्रास होत आहे. कमी वयातच हाडांचं दुखणं मागे लागत आहे.(how to keep bones healthy?)

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरातील कॅल्शियमची कमतरता हे तर आहेच. पण त्यासोबतच इतरही काही गोष्टी आहेत ज्यामुळे कमी वयातच हाडं कमकुवत होत आहेत. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया..

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हल्ली बहुतांश लोकांचा कामानिमित्तचा जास्तीतजास्त वेळ एसीमध्ये किंवा बंद खोलीमध्ये जातो. त्यामुळे त्यांना पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळत नाही. हाडांच्या मजबुतीसाठी ते सुद्धा गरजेचे असते.

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

हाडांच्या टिशूंमध्ये ताकद टिकून राहण्यासाठी शरीरात प्रोटीन्स योग्य प्रमाणात असणं गरजेचं असतं. जर शरीरात प्रोटीन्सची कमतरता असेल तर त्याचाही परिणाम हाडांवर होतोच.

फक्त कॅल्शियममुळेच नाही तर 'या' गोष्टींमुळेही हाडं झिजतात- कमी वयातच कमकुवत होतात

मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन के शरीरात योग्य प्रमाणात असतील तर त्यामुळे अन्नपदार्थांमधून शरीरात जाणारे कॅल्शियम रक्तामध्ये चांगल्या पद्धतीने शोषून घेण्यास मदत होते. हे दोन्ही पदार्थ शरीरात कमी असतील तर त्यामुळेही कॅल्शियमची कमतरता निर्माण होऊन हाडे कमकुवत होतात.