उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

Updated:March 6, 2026 20:00 IST2026-03-06T20:00:00+5:302026-03-06T20:00:02+5:30

How to fix bloated stomach: Summer diet for digestion: ५ पदार्थ खाल्ल्यास आपले पचन सुधारेल आणि पोटाच्या विकारांपासून आपल्याला आराम मिळेल.

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

उन्हाळा सुरु झाला की अनेकांना पोटाच्या समस्या सतावतात. भरपूर पाणी पिऊनही पोट साफ न होणं, पोट टम्म फुगणं आणि गॅसेसचा त्रास होण्याची समस्या अगदी सामान्य असली तरी त्रासदायक असते. उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास वाढतो. (How to fix bloated stomach)

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

आपण तासन्तास पाणी पितो, पण तरीही पोटाचा जडपणा कमी होत नाही. आपल्या आहारात फायबरची कमतरता आणि चुकीचे पदार्थ खाल्ल्यास हा त्रास जाणवतो. यावेळी ५ पदार्थ खाल्ल्यास आपले पचन सुधारेल आणि पोटाच्या विकारांपासून आपल्याला आराम मिळेल. (Summer diet for digestion)

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

उन्हाळ्यात सगळ्यात चांगले पेय म्हणजे ताक. यामध्ये प्रोबायोटिक्स असतात. जे पोटातील गुड बॅक्टेरियांचे प्रमाण वाढवते. जेवल्यानंतर एक ग्लास ताक प्यायल्याने पचन सुधारते आणि पोट फुगण्याची समस्या कमी होते.

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

पपईमध्ये पपेन नावाचे एन्झाईम असते. जे प्रथिने पचवण्यास मदत करते. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणानंतर पपई खायला हवी. ज्यामुळे पोट साफ होईल.

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

गॅस आणि पोट फुगल्यास ओवा हे औषधासारखे काम करते. अर्धा चमचा ओवा आणि चिमूटभर काळे मीठ कोमट पाण्यासोबत घेतल्यास पोटातील गॅस लगेच बाहेर पडण्यास मदत होते.

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

सबजा पचनासाठी अतिशय गुणकारी आहे. यात भरपूर फायबर असते. जे आतड्यांची हालचाल सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

उन्हाळ्यात सतत पोट फुगतं- पाणी पिऊन पोट डब्ब होतं? खा ५ पदार्थ- अपचनासह सगळे त्रास होतील कमी

काकडीमध्ये पाण्याचे प्रमाण ९५% असते आणि यात भरपूर फायबर असते. उन्हाळ्यात सॅलेड म्हणून काकडी खाल्ल्याने पोट साफ होण्यास मदत होईल. तसेच शरीरातील विषारी घटक देखील बाहेर टाकले जातील.