सतत मोबाइल पाहून मुलांचे डोळे झाले आळशी, लागतोय चष्मा, ‘हे’ पदार्थ खा-डोळे सांभाळा
Updated:February 5, 2025 16:20 IST2025-02-05T14:14:02+5:302025-02-05T16:20:17+5:30

मुलांना कमी वयातच चष्मा लागण्याचे प्रमाण खूप जास्त वाढले आहे. कारण त्यांचा स्क्रिन टाईम वाढल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो आणि त्या तुलनेत मात्र त्यांच्या आहारातून डोळ्यांसाठी पोषक पदार्थ पुरेशा प्रमाणात मिळत नाहीत.
स्क्रिन टाईम वाढल्यामुळे हल्ली डोळ्यांच्या समस्या लहानांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळ्यांच्याच वाढल्या आहेत. म्हणूनच असे काही पदार्थ आहेत जे आपण डोळ्याचं आरोग्य आणि नजर उत्तम राहण्यासाठी नियमितपणे खाल्ले पाहिजेत.
त्यापैकी पहिले आहे व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात देणारे पदार्थ. यामध्ये तुम्ही ब्रोकोली, गाजर, पपई खाऊ शकता.
डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरी अशी बेरी प्रकारातली फळंही उत्तम आहेत.
अमेरिकन ऑप्टोमेट्रिक असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमेगा ३ देणारे चिया सीड्स, जवस, अक्रोड यासारखे पदार्थही डोळ्यांसाठी उत्तम असतात,
तसेच सुर्यफुलाच्या बिया, बदाम, शेंगदाणे, अव्हाकॅडो, लाल सिमला मिरची हे पदार्थही डोळ्यांसाठी फायदेशीर आहेत.
डोळ्यांचं आरोग्य उत्तम राहण्यासाठी झिंकयुक्त पदार्थही भरपूर प्रमाणात खावे. यामध्ये तुम्ही हरभरे, डाळी, भोपळ्याच्या बिया, काजू, बदाम, चीज, दूध असे पदार्थ खाऊ शकता.