अशक्तपणा होईल दूर- रक्तही वाढेल! रोज खा 'ही' भरपूर प्रोटीन असलेली डाळ, हाडे होतील दणकट- मिळेल भरपूर ताकद
Updated:March 23, 2026 18:00 IST2026-03-23T18:00:00+5:302026-03-23T18:00:02+5:30
Healthy lentils for fitness and stamina: How to get energy and get rid of fatigue naturally: आपल्या आहारात या ५ डाळींचा समावेश केल्यास हाडे देखील दणकट होतील.

सध्याच्या धावपळीच्या जीवनात शारीरिक थकवा, अशक्तपणा आणि हाडांचे दुखणे ही सगळ्या मोठी समस्या बनली आहे. अनेकदा आपण महागडे सप्लिमेंट्स किंवा टॉनिक घेतो. पण आपल्या स्वयंपाकघरातच अशा काही गोष्टी आहेत ज्या, सूपरफूडपेक्षा कमी नाहीत. आपल्या शरीरासाठी सगळ्यात मोठा प्रोटीनचा स्वस्त स्त्रोत म्हणजे डाळी. शरीराची झीज भरून काढण्यासाठी, स्नायूंच्या मजबुतीसाठी आणि रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी डाळींचा आहारात समावेश करणे अत्यंत आवश्यक आहे.(Healthy lentils for fitness and stamina)
आपल्यापैकी अनेकांना प्रश्न पडतो की कोणती डाळ खाल्ल्याने शरीराला जास्त ताकद मिळेल. पण अशक्तपणा दूर करण्यासाठी आणि रक्त वाढवण्यासाठी आपण आपल्या आहारात या ५ डाळींचा समावेश केल्यास हाडे देखील दणकट होतील. (How to get energy and get rid of fatigue naturally)
कुळीथ हे उष्ण प्रकृतीचे असून शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यास आणि किडनी स्टोनसारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. यात लोहाचे प्रमाण भरपूर असल्याने रक्ताची कमतरचा भरून निघते.
उडीद डाळीत प्रोटीनसोबतच कॅल्शियम आणि पोटॅशियमचा उत्तम स्त्रोत आहे. हाडांना दणकट करण्यासाठी आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी उडीद डाळ खाणे फायदेशीर ठरते. ही डाळ पचायला जड असली तरी शरीराला दीर्घकाळ ऊर्जा मिळते आणि स्नायूंची वाढ वेगाने होते.
मसूर डाळीत फायबर आणि व्हिटॅमिन बी -६ मुबलक प्रमाणात असते. ही डाळ रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते. ज्यांना अशक्तपणा जाणवतो त्यांनी मसूर डाळीचे सूप प्यायला हवे.
आपली पचनशक्ती कमकुवत असेल तर मूग डाळ हा चांगला पर्याय आहे. ही डाळ सर्वात कमी वेळा पचते आणि शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करते.
आपल्या घरात रोज खाल्ली जाणारी डाळ म्हणजे तूर डाळ. यात फॉलिक अॅसिड आणि मॅग्नेशियम असते. जे मेंदूच्या आरोग्यासाठी आणि गरोदर महिलांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. वरण-भाताच्या स्वरूपात ही डाळ खाल्ल्याने शरीराला आवश्यक कार्बोहायड्रेट्स आणि प्रोटीनचा समतोल मिळतो.