1 / 7पावसाळ्यात वातावरणात गारवा असल्यामुळे आपल्या सर्दी-खोकला किंवा ताप येतो. इतकंच नाही तर या काळात साथीचे रोग, पोटाचे विकार देखील वाढू लागतात. हवेतील ओलावा आणि तापमानातील बदलामुळे शरीराची रोगप्रतिकाशक्ती कमी होऊ लागते. (Monsoon immunity booster foods)2 / 7रोगप्रतिकाशक्ती कमी झाल्यावर अशक्तपणा जाणवतो. तोंडाची चव बिघडते अशावेळी आपल्या दैनंदिन आहारात काही स्वयंपाकघरातील मसाल्यांचा समावेश केल्यास आजारांपासून वाचण्यास मदत होईल. सर्दी-खोकल्यापासून बरे होण्यासाठी हे ५ पदार्थ खा. (Home remedies for cold and fever)3 / 7आल्यामध्ये जंतूनाशक आणि लसणामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म आहेत. पावसाळ्यामध्ये आले-लसूणचं सूप, चहा किंवा भाजीमध्ये वापर केल्यास शरीराला उब मिळते आणि सर्दी-खोकल्यापासून संरक्षण होते.4 / 7संत्री, मोसंबी, डाळिंब यांसारखी व्हिटॅमिन C युक्त फळं खाल्ल्याने शरीरात अँटिऑक्सिडंट्स वाढतात. ही फळं रोगप्रतिकारशक्ती मजबूत करून संसर्गजन्य आजारांपासून बचाव करतात.5 / 7तुळशीची पानं ही पावसाळ्यातील सर्वात उत्तम औषध मानली जातात. तुळशीचा काढा किंवा चहा प्यायल्याने सर्दी कमी होते, तसेच रोगप्रतिकारशक्तीही वाढते.6 / 7हळद ही नैसर्गिक अँटीसेप्टिक आहे. रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात हळद घालून प्यायल्याने शरीराला उब मिळते, सर्दी-खोकला कमी होतो आणि शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. 7 / 7पावसाळ्यातील वातावरणामुळे पचनशक्ती मंदावते. अशावेळी गरमागरम भाज्यांचं सूप किंवा मूग डाळीचं सूप हे हलकं, पचायला सोपं आणि पोषणदायी ठरतं.