चमचाभर एरंडेल तेल म्हणजे कॉन्स्टिपेशन गायब, चेहऱ्यावरही येते चमक! ‘या’ पद्धतीने वापरा कॅस्टर ऑइल
Updated:May 5, 2025 16:28 IST2025-05-05T12:44:17+5:302025-05-05T16:28:51+5:30

कॅस्टर ऑईल म्हणजेच एरंडेल तेल आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आपल्याकडे आयुर्वेदात एरंडेल तेल वापरण्याचे अनेक फायदे सांगितले आहेत.
ते फायदे नेमके कोणते आणि त्यासाठी एरंडेल तेलाचा नेमका कसा वापर करायचा, याची माहिती आहारतज्ज्ञांनी shweta_shah_nutritionist या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
त्यानुसार त्या सांगतात की दररोज झोपण्यापुर्वी २ ते ४ थेंब कॅस्टर ऑईल नाभीमध्ये घालून हलक्या हाताने मसाज करा. यामुळे पोट फुगणे, पोट गुबारणे, गॅसेस होणे, ॲसिडीटी असा त्रास कमी होतो.
त्वचा छान हायड्रेटेड ठेवून त्वचेवर ग्लो येण्यासाठीही बेंबीमध्ये कॅस्टर ऑईल घालणे फायद्याचे ठरते.
कॅस्टर ऑईल आणि तूप हे दोन्ही एकत्र करून त्याचे ४ ते ५ थेंब नाभीमध्ये घातल्यास बॉडी डिटॉक्स होते. म्हणजेच शरीरातील विषारी द्रव्ये शरीराबाहेर पडण्यास मदत होते.
मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठीही एरंडेल तेल उपयुक्त ठरते.
यामध्ये तज्ज्ञ असं सांगतात की आपल्या नाभीच्या खाली अनेक रक्तवाहिन्या, काही बिंदू असतात. जेव्हा आपण नाभीमध्ये काही थेंब तूप किंवा एरंडेल तेल घालतो, तेव्हा त्याचा थेट लाभ शरीरातील विविध अवयवांना होतो..