मांडी घालून जेवावं असं का म्हणतात? ७ कारणं, नेहमी मांडी घालून जेवायला बसाल
Updated:December 14, 2025 21:04 IST2025-12-14T20:03:13+5:302025-12-14T21:04:49+5:30
Benefits Of Eating While Sitting On The Floor : जेवताना थोडं पुढे झुकणं आणि पुन्हा सरळ होणं यामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो ज्यामुळे ते बळकट होतात.

जमिनीवर बसून जेवल्यानं तब्येतीला बरेच फायदे मिळतात. जमिनीवर बसल्यानं पोटावर हलका दाब पडतो. ज्यामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. या आसनात सुखासन किंवा अर्ध पद्मासन म्हणतात जे पचन उत्तेजित करते. (Benefits Of Eating While Sitting On The Floor)
मांडी घालून बसल्यानं हृदयावरचा दाब कमी होतो आणि रक्तप्रवाह शरीराच्या खालच्या भागाकडे अधिक चांगल्या प्रकारे होतो.
जमिनीवर बसण्यासाठी गुडघे, पायांचे सांधे आणि कंबरेला वाकवावे लागते. यामुळे नियमितपणे सांधे ताणले जातात आणि शरीराची लवचिकता आणि मजबूती वाढते.
जेवताना थोडं पुढे झुकणं आणि पुन्हा सरळ होणं यामुळे पोटाच्या स्नायूंना व्यायाम मिळतो ज्यामुळे ते बळकट होतात.
जमिनीवर बसून जेवताना आपण शांतपणे आणि सावकाश जेवतो. ज्यामुळे आपल्याला पोट भरल्याची जाणीव लवकर होते आणि अतिरिक्त खाणं टाळता येते.
खाली बसून जेवलयानं मन अधिक शांत होते आणि अन्नवर तसंच जेवणाच्या क्रियेवर लक्ष केंद्रीत होते ज्यामुळे जेवणाचा अनुभव अधिक चांगला होतो.
ही भारतीय संस्कृतीतील एक आरोग्यदायी आणि पारंपारीक सवय आहे जी शारीरिक आणि मानसिक आरोग्य राखण्यास मदत करते.