छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

Updated:January 20, 2026 19:01 IST2026-01-20T16:12:23+5:302026-01-20T19:01:42+5:30

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

सध्या थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे सर्दी, खोकला, छातीत कफ होणे असे त्रास अनेकांना छळत आहेत.(ayurvedic remedies to reduce cough)

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

बऱ्याच लोकांना तर कफ आणि खोकल्याचा एवढा त्रास असतो की महिनाभर त्यांचा त्रास कमी होत नाही. छातीमध्ये कफ साचून राहातो. तसेच सारखं खोकून खोकून पाठ, छातीही दुखायला लागते.(how to get rid of cough?)

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

यावर काय उपाय करता येईल याविषयी डॉक्टरांनी दिलेली माहिती drharishpatankar या इंस्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे. यामध्ये ते म्हणतात की जर जुनाट कफ झाला असेल तर तो कमी करण्यासाठी सुर्यास्तानंतर काही दिवस खाणं बंद करा. करण त्यामुळे कफ प्रवृत्ती वाढत जाते. त्यामुळे रात्रीचं जेवण लवकर घ्या. तसेच सुर्यास्तानंतर रात्री झोपेपर्यंत गरम पाणीच प्या.(home hacks to get rid of dry cough)

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

खोकला कमी करण्यासाठी डॉक्टरांनी सांगितलेला एक उपाय म्हणजे सूंठ पावडर आणि चिमूटभर हळद गुळासोबत खाणे. दिवसातून १- २ वेळा हे मिश्रण खा. अगदी दोन दिवसांतच खोकला कमी झाल्यासारखा जाणवेल.

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

हळदीचं दूध काही दिवस नियमितपणे रोज रात्री झोपण्यापुर्वी प्यायल्यास खोकला, कफ कमी होण्यास नक्कीच मदत होते.

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

तुळशीची पानं, सुंठ, चिमूटभर हळद, दालचिनी पावडर, ज्येष्ठमध हे सगळे पदार्थ थोडे थोडे घ्या आणि दिड कप पाण्यात उकळा. पाणी उकळून १ कप झाल्यानंतर गॅस बंद करा. या काढ्यामध्ये थोडा गूळ घाला आणि रात्री झोपण्यापुर्वी तो गरमागरम प्या. कफ आणि खोकला दोन्हीही कमी होईल.

छातीत कफ, खोकून खोकून पाठ- छाती दुखायला लागली? १ उपाय- जुनाट खोकला होईल कमी

हे उपाय करूनही खोकला कमी होत नसेल तर जास्त दिवस दुखणं अंगावर न काढता लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.