सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

Updated:July 23, 2025 16:51 IST2025-07-23T14:16:47+5:302025-07-23T16:51:34+5:30

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

असे काही पदार्थ आहेत जे आपण सकाळच्या वेळी उपाशीपोटी खाणं पुर्णपणे टाळलं पाहिजे. कारण ते पदार्थ खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे पोट बिघडून ॲसिडीटी, अपचन, गॅसेस, उलट्या, जुलाब असा त्रासही होऊ शकतो.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

डॉ. सुरेंद्र कुमार यांनी सोशल मिडीयावर शेअर केलेल्या माहितीनुसार दिवसाची सुरुवात जर प्रोसेस्ड फूड खाऊन केली तर गॅसेस वाढून पोट फुगण्याचा त्रास होेतो. रोगप्रतिकारक शक्तीवरही त्याचा परिणाम होतो.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

संत्री, लिंबू, मोसंबी, किवी अशी आंबट फळं उपाशीपोटी खाऊ नका. त्यामुळे ॲसिडीटी वाढून डोकेदुखी, करपट ढेकर येणे, उलट्या असा त्रास होऊ शकतो. ज्यांना ॲसिडीटीचा त्रास असतो, त्यांनी तर हा नियम कटाक्षाने पाळायला हवा.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

मसालेदार, तिखट, तेलकट पदार्थ नाश्त्यामध्ये खात असाल तर त्यामुळे ॲसिडीटी आणि उलट्यांचा त्रास होऊ शकतो. तसेच पोट बिघडू शकते.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

दही हे प्रोबायोटीक आहे, ते पचनासाठी निश्चितच मदत करतं. पण उपाशीपोटी दही खाणं टाळायला हवं.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

सकाळी उपाशीपोटी काही न खाता पिता नुसतेच एका नंतर एक कॉफीचे कप संपवत असाल तर त्यामुळेही ॲसिडीटी, एन्झायटी प्रचंड वाढू शकते.

सकाळी उपाशीपोटी 'हे' पदार्थ खाल्ले तर तुम्ही हमखास आजारी पडाल! पोट खराब- ॲसिडीटीही वाढेल

ब्रेड, पाव, केक, बिस्किटं, टोस्ट असे बेकरी पदार्थही उपाशीपोटी खाणं टाळावं. यामुळे पोट जड होतं. त्यांचं पचन व्हायला बराच वेळ लागत असल्याने दिवसभर सुस्त, आळशी वाटतं. झोपही येते.