पोट नेहमीच जड- फुगलेलं वाटतं? ५ गोष्टी चुकूनही करू नका, अपचनाचा त्रास कायमचा जाईल
Updated:February 7, 2026 15:32 IST2026-02-07T15:26:21+5:302026-02-07T15:32:22+5:30

बऱ्याच लोकांची अशी तक्रार असते की त्यांना नेहमीच अपचनाचा त्रास असतो. अगदी काहीही खाल्लं तर पोट खूप फुगल्यासारखं वाटतं. जड वाटायला लागतं.(avoid 5 things after meal for better digestion)
याशिवाय नेहमीच आंबट किंवा करपट ढेकर येणं, गॅसेस, ॲसिडीटी असा त्रासही होतो. हे सगळे त्रास टाळायचे असतील तर जेवणानंतर काही गोष्टी करणं पुर्णपणे टाळायला हवं. त्या गोष्टी नेमक्या कोणत्या ते पाहूया...(how to get rid of indigestion?)
जेवण झाल्या झाल्या कधीही झोपू नका किंवा एका जागी बसून राहू नका. जेवण झाल्यानंतर काही वेळ शतपावली करणं खूप गरजेचं आहे. मग ते दुपारचं जेवण असो किंवा मग रात्रीचं.. कारण जेवल्यानंतर बसून राहिल्याने किंवा झोपल्याने पचनक्रिया मंदावते आणि ॲसिडीटी, ब्लोटींग, गॅसेस असे त्रास सुरू होतात. जेवण आणि झोप यांच्यामध्ये किमान २ तासांचा गॅप तरी असायलाच हवा.
जेवण झाल्यानंतर काही वेळ खूप जड किंवा धावपळीची कामं करणं टाळायला हवं. तसेच जड व्यायामही करू नये. कारण यामुळे पचनासाठी गरजेचा असणारा रक्तपुरवठा शरीराच्या इतर भागासाठी वापरला जातो आणि त्यामुळे पचन व्यवस्थित न झाल्याने अपचन होऊ शकतं.
जेवण झाल्यानंतर फळं खाण्याची सवयही खूप जणांना असते. ते देखील खूप चुकीचं आहे. कारण शरीर आधी फळं पचविण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे मग त्याआधी घेतलेलं अन्न पचायला वेळ लागतो किंवा बऱ्याचदा ते पचतही नाही. त्यामुळे मग अपचनाचे वेगवेगळे त्रास सुरू होतात.
जेवण झाल्यानंतर किमान एक ते दिड तास तरी आंघोळ करू नये. यामुळे पचनाचे वेगवेगळे विकार जडू शकतात.
जेवण झाल्यानंतर चहा, कॉफी घेणं टाळा. कारण यामुळे अन्नपदार्थांमधले पौष्टिक घटक शरीरात व्यवस्थित मिसळले जात नाहीत.