रोज आहारात हवेतच चिमूटभर तीळ, इवलासा तीळ देतो भरपूर पोषण-अनेक आजार राहतात कायमचे लांब
Updated:May 16, 2025 19:12 IST2025-05-16T19:04:11+5:302025-05-16T19:12:24+5:30
A pinch of sesame seeds in the daily diet provides a lot of nutrition : तीळ खाण्याचे फायदे माहिती आहेत का? आहारात तीळ असणे फार गरजेचे.

आहारात विविध गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा समावेश असणे फार गरजेचे आहे. असे काही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात असतात. जे आपण फक्त कधी तरी अन्नात घालतो. मात्र ते आरोग्यासाठी फार उपयुक्त असतात.
पांढरे तीळ घरात असतातच. मात्र ते फक्त पराठ्यावर घालायला. तसेच एखाद्या चटणीत घालण्यासाठीच आपण वापरतो. इतर वेळी त्याचा फार काही वापर करत नाही.
मात्र हे तीळ आरोग्यासाठी फार फायद्याचे असतात. त्यामुळे ते फक्त फोडणीसाठी वापरण्यापेक्षा भाजीत तसेच चपातीच्या पीठात घालायला सुरवात करा. तीळ आहारात वारंवार घेतल्याने विविध फायदे मिळतात.
पांढरे तीळ अनेक गुणधर्मांनी परिपूर्ण असतात. त्यात कॅल्शियम असते, मॅग्नेशियम असते. जीवनसत्त्व 'इ' असते तसेच जीवनसत्त्व 'बी६' असते. इतरही काही सत्वे असतात.
तीळात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तीळ खाल्याने पचनाची क्रिया सुरळीत होते. बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही तसेच इतरही पोटाचे त्रास होत नाहीत.
तीळात फायबरचे प्रमाण भरपूर असते. त्यामुळे तीळ खाल्याने पचनाची क्रिया सुरळीत होते. बद्धकोष्टतेचा त्रास होत नाही तसेच इतरही पोटाचे त्रास होत नाहीत.
शरीरातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तीळ उपयुक्त ठरतात. त्यामुळे हृदयासाठी हे तीळ चांगले असतात.
केसांसाठी तीळ गुणकारी असतात. केस गळणे कमी होते. तसेच पांढरे केसांचे प्रमाण वाढत नाही. चमकदार केसांसाठी या तीळाचे विविध प्रॉडक्ट्स मिळतात.
सांधेदुखी कमी करण्यासाठी तीळाचा उपयोग होतो. तीळात अँण्टी ऑक्सिडंट्स असतात तसेच अँण्टी इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. त्यामुळे तीळ आहारात असणे फायद्याचे असते.
पांढरे तीळ कॅल्शियम, मॅग्नेशियम तसेच फॉस्फरसने परिपूर्ण असते. त्यामुळे हाडांच्या आरोग्यासाठी तीळाचे तेल तसेच आहारात तीळ असणे फायद्याचे ठरते.