हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

Updated:July 2, 2025 22:05 IST2025-07-02T22:00:00+5:302025-07-02T22:05:02+5:30

7 Warnings Which Indicate Your Heart Is Getting Weaker Check Details Here : Top 7 Early Warning Signs of Heart Disease You Should Never Ignore : 7 common symptoms of a weak heart that appear months before a heart attack : 7 warning signs of early heart failure : हृदय कमजोर झाल्यावर शरीर कोणते ७ संकेत देतं, जे दुर्लक्ष करून चालणार नाहीत ते पाहा...

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

'हृदय' हा आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा अवयव आहे. हृदय (7 Warnings Which Indicate Your Heart Is Getting Weaker) अखंडपणे रक्ताभिसरण करून शरीराच्या प्रत्येक भागाला प्राणवायू आणि पोषणद्रव्यं पोहोचवण्याचं काम करतं. परंतु, जेव्हा हृदय कमजोर होऊ लागतं, तेव्हा शरीर काही लहान - मोठ्या संकेतांद्वारे आपल्याला धोक्याची जाणीव करून देतं.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

या संकेतांकडे वेळीच लक्ष दिलं नाही, तर पुढे हृदयरोगाचा गंभीर धोका ( Top 7 Early Warning Signs of Heart Disease You Should Never Ignore) वाढू शकतो. त्यामुळे या लक्षणांना ओळखून (7 warning signs of early heart failure) वेळीच वैद्यकीय सल्ला घेणं किंवा इतर उपचार करणे आवश्यक असते. हृदय कमजोर झाल्यावर शरीर कोणते ७ संकेत देतं, जे दुर्लक्ष करून चालणार नाहीत ते पाहूयात.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

छातीत दुखणं हे हृदयरोगाचं सर्वात सामान्य आणि गंभीर लक्षण आहे. यालाच 'अँजायना' असंही म्हणतात. हे दुखणं छातीच्या मध्यभागी, डाव्या किंवा काहीवेळा उजव्या बाजूला देखील जाणवू शकतं. काहीवेळा हे दुखणं मान, खांदा किंवा पाठीपर्यंत देखील पसरू शकतं. छातीत जडपणा किंवा तीव्र वेदना जाणवत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, कारण हा हार्ट ॲटॅकचा संकेत असू शकतो.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

जर पाय, घोटे किंवा पंजांमध्ये सतत सूज कायम राहत असेल, तर हा हार्ट फेल्युअरचा संकेत असू शकतो. हृदय कमजोर झाल्यास शरीरातील रक्ताभिसरण व्यवस्थित पद्धतीने होत नाही, ज्यामुळे पायांच्या शिरांमध्ये द्रव साचू लागतो आणि त्यामुळे पायांना सूज येते.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

हृदय कमजोर झाल्यावर शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही, त्यामुळे सतत थकवा आणि कमजोरी जाणवू लागते. अगदी साधं काम, जसं की चालणं किंवा जिने चढणं उतरणं केलं तरी थकल्यासारखे वाटते. नेहमीची साधी सोपी काम करताना देखील जर दम लागायला लागला किंवा खूपच थकवा जाणवू लागला, तर तो हृदयाशी संबंधित समस्येचा संकेत असू शकतो.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

काहीवेळा हृदयाच्या समस्येमुळे होणाऱ्या वेदना जबड्यापर्यंत पोहोचतात. विशेषतः महिलांमध्ये हार्ट ॲटॅकच्या वेळी छातीऐवजी जबडा किंवा मानेत वेदना जाणवू शकते. जर कोणतीही इजा किंवा दातांची समस्या नसतानाही जबड्यात दुखणं सुरू झालं, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

काहीवेळा हृदयाशी संबंधित समस्यांमध्ये पोटाच्या वरच्या भागात जळजळ, वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. अनेकदा आपण याला ॲसिडिटी समजून दुर्लक्ष करतो, परंतु हे हार्ट ॲटॅक लक्षणही ठरू शकतं.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

हृदयाशी संबंधित समस्या असल्यास अनेकांना चक्कर येणे, मळमळ किंवा उलटीसारखं वाटू शकतं. विशेषतः महिलांमध्ये हार्ट ॲटॅकच्या वेळी ही लक्षण जास्त प्रमाणात दिसून येतात.

हृदय कमजोर होतंय, माझं ऐका म्हणत शरीर सांगतं ७ गोष्टी, उशीर झालाच तर संपलं सगळं!

पायांच्या स्नायूंमध्ये, विशेषतः पोटऱ्यांमध्ये दुखणं हे पेरिफेरल आर्टरी डिसीज (PAD)चे संकेत असू शकतात. या अवस्थेत हृदयापर्यंत रक्तपुरवठा योग्यरीत्या होत नाही, ज्यामुळे पायांमध्ये वेदना आणि आकडी येऊ शकते.