रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

Updated:September 28, 2025 16:00 IST2025-09-28T16:00:00+5:302025-09-28T16:00:02+5:30

Superfoods for immunity: 7 superfoods daily: Immunity boosting foods: Healthy foods for energy: रोज काही सुपरफूड खाल्ल्यास महिन्याभरात आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत चुकीचा आहार, सततचा ताण यामुळे आपलं शरीर लवकर थकतं. यामुळे लहानसहान त्रासही आपल्याला मोठा वाटू लागतो. अगं दुखणं, हाडं कमकुवत होणं, वारंवार सर्दी-खोकला होणं किंवा सतत थकवा जाणवणं. अशा वेळी शरीरासाठी फक्त पोट भरण गरजेच नाही तर योग्य पोषण मिळणं देखील महत्त्वाचं आहे. (Superfoods for immunity)

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन, कॅल्शियम मिळणं देखील महत्त्वाचं आहे. यासाठी आपल्याला रोजच्या आहारात काही पदार्थांचा समावेश करायला हवा. ज्यामुळे आपलं शरीर अधिक फिट राहिल आणि इन्फेक्शनपासून आपण दूर राहू शकतो. रोज काही सुपरफूड खाल्ल्यास महिन्याभरात आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल. (7 superfoods daily)

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

आवळ्यात असणारे व्हिटॅमिन सी शरीराला आतून बळकटी देण्यास मदत करते. यामुळे आपले रक्त शुद्ध होते, त्वचा निरोगी राहते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत मिळते. यासाठी आवळ्याचा रस देखील पिऊ शकतो.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

सफरचंदातील फ्लेव्होनॉइड्स आणि व्हिटॅमिन सी आहे. जे आपल्याला व्हायरल इन्फेक्शनपासून रोखण्यास मदत करते.सफरचंदातील फायबर पचन सुधारण्यास आणि शरीरातील चांगले बॅक्टेरिया वाढण्यास प्रोत्साहन देतात.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

रोज बदाम खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत होण्यास मदत होते.यात असलेले व्हिटॅमिन ई आणि निरोगी चरबी शरीरातील पेशींचे संरक्षण करतात. हे आपल्या मेंदू आणि हृदयासाठी देखील फायदेशीर आहे.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि ए दोन्ही चांगल्या प्रमाणात असतात. यात पपेन नावाचे एंजाइम असते. जे पचनास मदत करते आणि शरीरातील जळजळ कमी करते. पपई खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

लसूण हे अनेक आजारांवर औषधी मानले गेले आहे. यात असलेले अ‍ॅलिसिन शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि बॅक्टेरियाशी लढण्यास मदत करते. सर्दी-खोकल्यासारख्या आजारावर लसूण बहुगुणी आहे.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

बीटमध्ये लोह, फोलेट आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे रक्त शुद्ध करण्यास आणि शरीरातील ऑक्सिजनचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. बीट खाल्ल्याने आपल्याला ऊर्जा मिळते आणि थकवा कमी होतो.

रोज खा ७ सुपरफूड- महिनाभरात इम्युनिटी स्ट्राँग! हाडं होतील लोखंडासारखी, थकवा होईल कमी

हळद ही अनेक आजारांवर खजिना मानण्यात आली आहे. यात असणारे कर्क्यूमिन नावाचे संयुग शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि जळजळ कमी करतात. हळदीचे दूध सर्दी-खोकल्यासारख्या आजारांवर रामबाण आहे.