उन्हाळ्यात चुकूनही खाऊ नयेत असे ७ पदार्थ! डिहायड्रेशनची वाढते- थकवा आणि चक्कर येऊन पडाल आजारी...
Updated:May 10, 2025 12:38 IST2025-05-10T09:46:29+5:302025-05-10T12:38:50+5:30
7 popular indian foods that secretly dehydrate you this summer : 7 foods that secretly dehydrate you in summer : कोणते असे पदार्थ आहेत जे खाल्ल्याने आपण उन्हाळ्यात डिहायड्रेटेड होऊ शकतो, ते पाहा...

उन्हाळ्यात वारंवार डिहायड्रेशनच्या समस्येचा सामना करावा लागतो. रणरणत्या (7 popular indian foods that secretly dehydrate you this summer) उन्हामुळे आणि वातावरणातील उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन आपले शरीर डिहायड्रेटेड होते. अशावेळी आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण अधिक असणाऱ्या पदार्थांचा समावेश करणे खूप आवश्यक असते.
आपल्या रोजच्या आहारातील काही पदार्थ असे असतात की (7 foods that secretly dehydrate you in summer) जे उन्हाळ्यात खाल्ल्याने शरीर आतून डिहायड्रेटेड होते. आपल्या रोजच्या आहारातील असे ७ पदार्थ कोणते आहेत जे खाल्ल्याने आपण उन्हाळ्यात डिहायड्रेटेड होऊ शकतो, ते पाहूयात...
१. लोणचं :-
उन्हाळ्यात लोणचं खाल्ल्याने शरीर आतून डिहायड्रेटेड होऊ शकते. लोणच्यात सोडियम जास्त प्रमाणांत असते ज्यामुळे शरीरात भरपूर प्रमाणांत पाणी साचून वारंवार लघवीला जाण्याचा त्रास सुरु होऊ शकतो.
२. ग्रेव्ही आणि रस्सेदार भाज्या :-
ग्रेव्ही आणि रस्सेदार भाज्या मसालेदार होण्यासाठी खड्या मसाल्यांचा वापर केला जातो. मिरची, दालचिनी, काळीमिरी यांसारख्या मसाल्यांमुळे आपल्याला घाम जास्त प्रमाणांत येतो. गरजेपेक्षा जास्त घाम आल्याने शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडते परिणामी, शरीरातील पाणी कमी झाल्याने डिहायड्रेशनची समस्या होऊ शकते.
३. तळलेले पदार्थ :-
उन्हाळ्यात जास्त तळलेले पदार्थ खाणे टाळावे. तेलकट आणि मिठाचे प्रमाण जास्त असलेले पदार्थ पचनाचा वेग कमी करतात. परिणामी, खाल्लेले अन्नपदार्थ व्यवस्थित पचत नाही. यामुळे हार्मोनल इंबेलेन्स आणि पोटाच्या तक्रारी त्रास देऊ शकतात.
४. चाट :-
चाटच्या वेगवेगळ्या पदार्थनांमध्ये असलेलं मीठ, मसाले आणि आंबट - गोड चटण्या डिहायड्रेशनच्या समस्येचे मुख्य कारण असतात. चाटचे पदार्थ खाल्ल्याने शरीरात इलेक्ट्रोलाइट्स एम्बॅलेन्स आणि डिहायड्रेशन होऊ शकते.
५. मसाला पापड :-
हलका - फुलका म्हणून आपण मसाला पापड आवडीने खातो. परंतु पापडात असलेल्या मीठ आणि मसाल्यांमुळे उन्हाळ्यात डिहायड्रेशन होऊ शकते.
६. नमकीन स्नॅक्स :-
चिवडा, गाठीया, शेव अशा नमकीन स्नॅक्समध्ये प्रिझर्व्हेटिव्हज, मीठ आणि फॅट्सचे प्रमाण जास्त असते. अशा पदार्थांमध्ये सोडियमचे प्रमाण जास्त व पाण्याचे प्रमाण कमी असल्याने असे पदार्थ वारंवार खाल्ल्याने डिहायड्रेशन होऊ शकते.
७. चहा - कॉफी :-
कॉफीमध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते. उन्हाळ्यात चहा - कॉफी जास्त प्रमाणात घेतल्यास वारंवार लघवीला होऊन शरीरातून पाणी बाहेर पडते आणि डिहायड्रेशन होऊ शकते.