तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

Updated:September 16, 2025 13:13 IST2025-09-16T13:03:13+5:302025-09-16T13:13:59+5:30

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

हल्ली आपण बघतो आहोत की कमी वयातच वेगवेगळे आजार डोकं वर काढायला लागले आहेत. कॅन्सर, हार्ट ॲटॅक या आजारांचं प्रमाणही वाढलं आहे.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

त्यामुळे प्रत्येक महिलेने वयाची तिशी ओलांडल्यानंतर कुटूंबासोबतच स्वत:च्या तब्येतीचीही थोडी विशेष काळजी घ्यायला हवी. कारण तुम्ही आजारी पडलात तर जणू काही सगळं घरच आजारी होऊन जातं.(6 Superfoods for Every Woman Over 30)

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

त्यामुळेच साधारण तिशीच्या आतबाहेर असणाऱ्या प्रत्येक महिलेने काही पदार्थ रोजच्या रोज खायलाच हवेत असं आहारतज्ज्ञ सांगत आहेत. ते पदार्थ नेमके कोणते याविषयीची माहिती आहारतज्ज्ञांनी leemamahajan या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.(every woman must eat 6 foods for avoiding risk of cancer)

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

त्यापैकी पहिला पदार्थ आहे जवस. रोज १ चमचा जवस खायला हवे. त्यात असणाऱ्या घटकांंमुळे स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. तसेच पिरियड्समधला त्रासही कमी होतो.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

डाळिंबाचे १ वाटीभर दाणे रोज खायला हवे. त्यामुळे फायब्रॉईडचा त्रास कमी होण्यास मदत होते. तसेच गर्भाशयाचे कार्य व्यवस्थित राहून हार्मोन्सही संतुलित राहण्यास मदत होते.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

तिसरा पदार्थ आहे आवळा. रोज १ आवळा खाल्ल्याने कोलॅजीनची निर्मिती चांगली होते. त्यामुळे त्वचा आणि केस तर चांगले होतातच, पण रोगप्रतिकारक शक्तीही वाढते.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

रोज पुदिन्याची पानंही तुमच्या आहारात असायलाच हवी. १०० ग्रॅम पुदिन्याची पानं खाल्ली तर त्यातून तुम्हाला तुमच्या शरीराला दररोज जेवढं लोह गरजेचं असतं त्याच्या ७० टक्के लोह मिळते. हिमोग्लोबिनची कमतरता असणाऱ्या महिलांनी पुदिन्याची पानं रोज खायला हवी. पुदिना नियमितपणे खाल्ल्यास मासिक पाळीतला त्रासही कमी होतो.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

चिया सीड्ससुद्धा खूप उपयोगी आहेत. त्यांच्यामध्ये ओमेगा ३ आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे हृदय, मेंदूचे आरोग्य चांगले राहाते तसेच ओव्हेरियन कॅन्सरचा धोकाही कमी होतो.

तिशीनंतर प्रत्येक महिलेने खायलाच हवेत ५ पदार्थ- कॅन्सर, हार्ट ॲटॅकसह कित्येक आजारांचा धोका टळू शकतो

तीळ देखील खूप आरोग्यदायी आहेत. रोज १ टेबलस्पून तीळ खायला हवे. त्यामुळे प्रोजेस्टेरॉन हार्मोन नियंत्रित राहातो. तसेच तिळांमधे असणाऱ्या कॅल्शियममुळे हाडांनाही बळकटी मिळते.