डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

Updated:February 13, 2026 10:00 IST2026-02-13T10:00:00+5:302026-02-13T10:00:02+5:30

6 Powerful Superfoods To Reduce Diabetes Risk : natural ways to lower blood sugar with diet : superfoods to lower diabetes risk : डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी, रोजच्या आहारातील नैसर्गिक आणि पौष्टिक सुपरफूड्स कोणते ते पाहा...

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

'डायबिटीस' पूर्वी केवळ वयोवृद्धांमध्ये दिसायचा, पण आता बदलती (superfoods to lower diabetes risk) लाईफस्टाईल, जंक फूडचे अतिप्रमाणं, स्ट्रेस आणि व्यायामाचा अभाव यामुळे तरुण पिढीलाही अवघ्या लहान वयातच 'डायबिटीस' होत आहे. अशा परिस्थितीत, जर आपला आहार योग्य असेल, तर डायबिटीजचा धोका बराच कमी करता येऊ शकतो. प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी काही 'सुपरफूड्स'ची यादी सांगितली आहे. हे पदार्थ रोज खाल्ल्यास डायबिटीसचा धोका कमी होण्यासोबतच, रक्तातील साखर नियंत्रित राहण्यासही मदत होते(6 Powerful Superfoods To Reduce Diabetes Risk).

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

डायबिटीसचा धोका कमी करण्यासाठी, आपल्या रोजच्या (foods to prevent diabetes naturally) आहारातील काही नैसर्गिक आणि पौष्टिक सुपरफूड्स महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. हे पदार्थ रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास, इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास आणि शरीराची एकूण प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात. रोजच्या आहारात योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने या सुपरफूड्सचा समावेश केल्यास आरोग्यावर सकारात्मक परिणाम दिसू शकतो.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

कारले चवीला अत्यंत कडू असते, पण ते शरीरासाठी तितकेच फायदेशीरही आहे. अनेकदा असे म्हटले जाते की, जे आरोग्यासाठी उत्तम असते त्याची चव जिभेला फारशी आवडत नाही. कारल्यामध्ये व्हिटॅमिन C, A, फोलेट आणि पोटॅशियम, लोह (Iron), झिंक, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे मुबलक प्रमाणात असतात. सर्वात महत्त्वाच म्हणजे कारल्यात 'पॉलीपेप्टाइड-पी' (Polypeptide-p) असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे मधुमेहींनी कारल्याची भाजी खाणे किंवा कारल्याचा रस पिणे अत्यंत गुणकारी ठरते.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

कारल्याप्रमाणेच ग्रीन टी ची चव देखील थोडी कडवट असते, परंतु ती आपल्या शरीरासाठी अतिशय आरोग्यदायी आहे. ग्रीन टी मध्ये पॉलिफेनोल्स (Polyphenols), फ्लेव्होनॉइड्स (Flavonoids) आणि कमी प्रमाणात कॅफीन असते, जे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. आहारतज्ज्ञांच्या मते, दिवसभरात २ ते ३ कप ग्रीन टी घेतल्यास मधुमेहींना त्याचा चांगला फायदा मिळू शकतो.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

पेरूमध्ये व्हिटॅमिन C, फायबर, पोटॅशियम, व्हिटॅमिन A आणि अँटी-ऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. पेरू खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी (Sugar Level) देखील नियंत्रणात राहते. डायबिटीजचा धोका कमी करण्यासाठी आहारात पेरूचा समावेश नक्की करा. पेरू हा आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असून, तुम्ही दररोज एक पेरू खाऊ शकता.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स, फायबर आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात असते. चिया सीड्सचे पाणी प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत होते, पचन सुधारते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत मिळते. चिया सीड्स रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावेत आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्यावे. यामुळे शरीराला जास्तीत जास्त फायदा मिळतो.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

दालचिनी हा स्वयंपाकघरात वापरला जाणारा एक असा मसाला आहे, जो जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी वापरला जातो. पण, या मसाल्याच्या वापराने तुम्ही डायबिटीजचा धोकाही कमी करू शकता. दालचिनीमध्ये सिनामाल्डिहाइड (Cinnamaldehyde), कॅल्शियम, लोह, मॅंगनीज, फायबर आणि प्रोटीन यांसारखे घटक असतात, जे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आपण जेवणामध्ये दालचिनीचा वापर करू शकता किंवा त्याचा चहा बनवूनही पिऊ शकता. मात्र, हे लक्षात ठेवा की दालचिनी अति प्रमाणांत घेतल्यास शरीरासाठी नुकसानकारक ठरू शकते, त्यामुळे ती योग्य प्रमाणातच वापरावी.

डायबिटीस होईल किंवा शुगर वाढेल म्हणून उपाशी राहू नका, न्यूट्रिशनिस्ट सांगतात ६ सुपरफूड्स...

द्राक्षे, संत्री, स्ट्रॉबेरी, मोसंबी किंवा कीनू यांसारख्या आंबट फळांमध्ये सायट्रिक ॲसिड (Citric Acid) मुबलक प्रमाणात असते. या फळांचा आहारात समावेश केल्याने रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मोठी मदत होते. ही फळे केवळ डायबिटीज कंट्रोल करत नाहीत, तर आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि पचनसंस्थाही मजबूत करतात. ही फळे नेहमी दिवसा खाणे फायदेशीर ठरते; संध्याकाळी किंवा रात्री खाल्ल्यास पचनसंस्थेसंबंधित अनेक त्रास होऊ शकतात.