Join us
Daily Top 2 Weekly Top 5

शरीरात होणाऱ्या ५ बदलांकडे दुर्लक्ष करणं पडेल महागात- मधुमेह, कोलेस्टेरॉलसारखे त्रास लागतील मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2025 17:29 IST

1 / 7
मधुमेह, कोलेस्टेरॉल, फॅटी लिव्हर, ट्रायग्लिसराईड, हृदयविकार यासारखे कोणतेच आजार एका रात्रीतून होत नाहीत. त्यामुळे या आजारांच्या अनुशंगाने जेव्हा आपल्या शरीरात काही बदल सुरू होेतात तेव्हाच आपले शरीर आपल्याला त्याबद्दल सुचना देत असते.
2 / 7
म्हणूनच शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे मुळीच दुर्लक्ष करता कामा नये. हे बदल नेमके कोणते असतात याविषयीची माहिती डॉक्टरांनी myexpertdoctor या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
3 / 7
यामध्ये डॉक्टर सांगतात की जेवल्यानंतर लगेचच खूप थकवा येणे, झोप आल्यासारखे वाटणे, आळस येणे हे चांगले लक्षण नाही. यातून तुमच्या शरीरातले इन्सुलिनचे कार्य बिघडत चालले आहे हे लक्षात येते.
4 / 7
वारंवार ॲसिडीटी, गॅसेस असे त्रास होत असतील तर तुमची पचनक्रिया आणि मेटाबॉलिझम या दोन्ही क्रिया बिघडल्या आहेत. याचा परिणाम लिव्हरवरही होतो.
5 / 7
गळ्यावर किंवा काखेत खूप काळपटपणा असेल तर ते ही मधुमेहाचं एक लक्षण असू शकतं.
6 / 7
जेव्हा शरीरातली साखर वेगात वाढते किंवा वेगात कमी होते तेव्हा वारंवार भूक लागते आणि सतत काहीतरी गोड खाण्याची इच्छा होत असते.
7 / 7
पोटाचा घेर वाढणे हे देखील बिघडलेल्या पचनक्रियेचे आणि मेटाबॉलिझमचे लक्षण आहे. याचा परिणाम लिव्हर आणि हृदयावरही होत असतो.
टॅग्स : आरोग्यमधुमेहहृदयरोग