शरीरातलं HB खूप कमी झालंय हे सांगणारी ५ लक्षणं, वेळीच ओळखा आणि तब्येत सांभाळा
Updated:September 15, 2025 17:27 IST2025-09-15T16:26:40+5:302025-09-15T17:27:29+5:30

HB म्हणजे हिमाेग्लोबिन कमी असेल तर त्या व्यक्तीला नेहमीच अशक्तपणा जाणवतो. थोड्याशा शारिरीक श्रमानेही त्या व्यक्ती खूप थकून जातात, गळून जातात. कोणतंही काम करण्याचा उत्साह त्यांच्यामध्ये नसतो.(5 unusual signs of Iron deficiency)
एचबी म्हणजे शरीरातलं रक्त कमी होणं ही अजिबात दुर्लक्षित करण्यासारखी बाब नाही. कधी कधी तर आपल्या शरीरातलं लोह कमी झालंय हे आपल्या लक्षातही येत नाही. कारण त्याच्यामुळे शरीरात दिसून येणारी लक्षणंच आपल्याला व्यवस्थित माहिती नसतात.(how to identify HB level is low?)
म्हणूनच ही काही लक्षणं पाहा आणि ती तुम्हालाही जाणवत असली तर एचबी वाढविण्यासाठी त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.(5 signs of hemoglobin deficiency)
हिमाेग्लोबिन कमी असल्यामुळे जाणवणारं एक महत्त्वाचं लक्षण म्हणजे जिभेला सूज आल्यासारखी दिसते आणि तिच्यावरचा खडबडीतपणा वाढतो.
दुसरं लक्षण म्हणजे तुम्हाला अन्नपदार्थांशिवाय इतर पदार्थ खावेसे वाटतात. कोणाला पाटीवरची पेन्सिल, खडू, माती, गव्हामधले खडे असे वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते. त्यालाच Pica असंही म्हणतात.
Restless Legs Syndrome (RLS) हा त्रास अनेकजणींना होतो. रात्री अंथरुणावर पडल्यानंतर पाय खूप ओढल्यासारखे होतात. पोटऱ्या दुखतात. त्यामुळे शांत झोपही लागत नाही.
नखं ठिसूळ होणं आणि नखांचा उंचवटा कमी होऊन त्यांचा मधला भाग खाली जाणं. यालाच spoon-shaped nails असंही म्हणतात.
सारखं झोपावं वाटणं. खूप आळस येणं, लगेचच गळून गेल्यासारखं वाटणं हे देखील शरीरात लोह कमी आहे, हे सांगणारं एक लक्षण आहे.