1 / 8हल्ली प्रत्येकाच्या हातात मोबाईल दिसतो. लहान मुलांना जसं मोबाईल पाहण्याचं वेड असतं तसंच ते मोठ्या माणसांनाही असतं.(5 tips for the safe use of mobile)2 / 8म्हणूनच तर घरातल्या वयस्कर व्यक्तींच्या हातातही कित्येकदा मोबाईलच दिसतो. कामानिमित्त तरुण मंडळींना तर मोबाईल सातत्याने वापरावाच लागतो. त्याला आता पर्याय नाही.3 / 8पण तुम्ही जर मोबाईल नेहमीच चुकीच्या पद्धतीने वापरत, पाहात असाल तर त्याचा आरोग्यावर, डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो. म्हणूनच तो सुरक्षितपणे कसा वापरावा याविषयी डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितलेल्या या काही टिप्स..4 / 8मोबाईल पाहताना तो नेहमी तुमच्या डोळ्यांपासून किमान १६ इंच दूर असावा. 5 / 8मोबाईल आपल्या शरीराच्या कोणत्याही भागावर ठेवून तो तासनतास पाहात बसू नये.6 / 8मोबाईलवर खूप वेळ बोलणे टाळावे. बोलायचेच असेल तर मोबाईल स्पीकरवर ठेवून बोलावा.7 / 8मोबाईल स्पीकरवर ठेवून बोलणे शक्य नसेल तर इयरफोन लावून बोलावे. जेणेकरून मोबाईल शरीरापासून, कानापासून, डोळ्यांपासून थोडा दूर राहील.8 / 8मोबाईल रात्रभर तुमच्या डोक्याशी ठेवू नका. मोबाईल तुमच्या डोक्याशी चार्जिंगला लावून झोपू नका. झोपताना मोबाईल तुमच्या आसपास नसेल तर जास्त उत्तम.